नंदुरबार l
शहरातील महाराणा प्रताप पुतळ्याजवळ फायटर कब्जात बाळगून मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, तळोदा शहरातील जोगणी माता मंदिर परिसरात राहणारा जोग्या किशोर वसावे हा नंदुरबार शहरातील महाराणा पुतळा परिसरात त्याच्या कब्जात घातक असे फायटर बाळगतांना आढळून आला.
तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोशि.विशाल मराठे यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात जोग्या वसावे यांच्या विरोधात महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३७ (१) (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.संदिप गोसावी करीत आहेत.








