तळोदा l प्रतिनिधी
तळोदा नगरपालिकेच्या वतीने नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्या हस्ते पालिकेच्या निधीतून उपलब्ध करण्यात आलेल्या वैकुंठ रथाचे लोकार्पण करण्यात आले.तळोदा पालिकेची सर्वसाधारण सभा संपल्यानंतर सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष अजय परदेसी यांनी या वैकुंठरथाचे फीत कापून लोकार्पण केले.
याप्रसंगी उपनगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी, काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक तथा प्रतोत संजय माळी,बांधकाम सभापती हितेंद्र क्षत्रिय,सुनयना उदासी,नगरसेवक सुभाष चौधरी,गौरव वाणी,जितेंद्र सूर्यवंशी,हेमलाल मगरे,रामानंद ठाकरे,सुरेश पाडवी,योगेश पाडवी,भास्कर मराठे,अमनोद्दिन शेख, नगरसेविका अनिता परदेशी,अंबिका शेंडे,शोभा भोई,बेबीबाई पाडवी,कल्पना पाडवी,सविता पाडवी,भाजपाचे शहराध्यक्ष योगेश चौधरी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संदीप परदेशी, माजी उपनगराध्यक्ष अनुप उदासी,नगरपालिकेच्या मुख्याधिकारी सपना वसावा, कार्यालयीन अधीक्षक राजेंद्र माळी आरोग्यवेक्षक अश्विन परदेसी,आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना नगराध्यक्ष अजय परदेशी म्हणाले की, मागील पाच वर्षात नागरिकांना अद्ययावत सोयी सुविधा देण्याच्या प्रयत्न करण्यात आला. त्याचा एक भाग म्हणून हे अध्ययवत व आकाराने मोठा असणारा वैकुंठ रथ तळोदेकरांच्या सेवेत आज दाखल होत आहे. रविवारपर्यंत शहरातील ज्येष्ठ नागरिक भावनांचे देखील लोकार्पण केले जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली.








