नंदुरबार l प्रतिनिधी
येथील श्रीमती डी.आर. हायस्कूल येथे राष्ट्रीय गणित दिन, गणित सामान्य ज्ञान स्पर्धा… गणित चित्र रंगभरण स्पर्धा… पाढे पाठांतर स्पर्धा अशा विविध स्पर्धानी संपन्न झाला. या सर्व स्पर्धेचे पारितोषिक दिनांक 22 डिसेंबर 2022 गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंती निमित्ताने संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे पर्यवेक्षक पंकज पाठक तर प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक नारायण भदाणे, उपमुख्याध्यापक सुभाष चौधरी, पर्यवेक्षक विपुल दिवाण, नंदुरबार जिल्हा गणित अध्यापक मंडळाचे जिल्हाध्यक्ष योगेश गवते, विज्ञान विभाग प्रमुख दिनेश वाडेकर, गणित विभाग प्रमुख भरत पेंढारकर तर ज्येष्ठ शिक्षिका राजश्री गायकवाड उपस्थित होत्या.
सर्वप्रथम गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन होऊन योगेश गवते यांनी प्रास्ताविकातून आजचा दिवस गणित दिन म्हणून का साजरा केला जातो याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. प्रत्येक दिवस शाळेत का साजरे केले जातात या मागचे कारण स्पष्ट केले. तदनंतर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवन चरित्रावर विद्यार्थ्यांनी त्यांच्या मनोगतातून प्रकाश टाकला त्यानंतर पाढे पाठांतर स्पर्धा पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांची नावे सुनीता बागुल यांनी वाचन केले,
गणित चित्र रंगभरण स्पर्धेतील पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांच्या यादीचे वाचन दिपाली भदाणे यांनी केले तर गणित सामान्य ज्ञान स्पर्धेतील पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांच्या यादीचे वाचन घनश्याम लांबोळे यांनी केले सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाचे शालोपयोगी वस्तूंचे पारितोषिके देऊन गौरवण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष पंकज पाठक यांनी गणित हा जीवनातला किती महत्त्वाचा घटक आहे. गणिताशिवाय सर्व शून्य आहे म्हणून विद्यार्थ्यांनी गणिताच्या अभ्यासाकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे व आपला विकास साधावा असे सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी दिनेश वाडेकर यांनी गणितावरील गमतीदार कविता म्हणून विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले व सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कमल चौरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशांत पाठक, दिलीप पाटील, प्रशांत पाटील, निलेश गावित शितल भट व सर्व शिक्षक आणि आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.








