नंदूरबार l प्रतिनिधी
एस.ए.मिशन प्राथमिक शाळा नंदुरबार येथे शाळेचा शताब्दी महोत्सव व सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमासाठी एस.ए.एम ट्रस्ट नंदुरबार या संस्थेचे चेअरमन जे .एच. पठारे,कार्यकारी संचालक डॉ.राजेश वळवी ,रेव्ह.आर .के. वळवी, संतोषदेशपांडे ,मार्था सुतार ,डॉ.राजेश वसावे, राजेश वळवी, एस ए मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य सौ.नूतनवर्षा वळवी ,तसेच एस.ए.एम. इंग्लिश मीडियम हायस्कूल च्या मुख्याध्यापिका श्रीम.डॉ.सुनिता, एस.ए. मिशन इंग्लिश मीडियम प्राथ.चे मुख्याध्यापक .संदेश यंगड , पाळक . अनुप वळवी, माजी मुख्याध्यापिका स्नेहलता कालू ,राजभोज , संजय पाटील , भानुदास गोसावी व शाळेच्या मुख्याध्यापिका सुषमा पाडवी या उपस्थित होत्या. तसेच शाळेचे माजी विद्यार्थी माजी नगरसेवक अर्जुन हटकर उपस्थित होते.
यावेळी शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या वस्तूंची हस्तकला प्रदर्शन भरवण्यात आले याचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन जे.एच.पठारे यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका सुषमा पाडवी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यकारी संचालक श्री.वळवी यांनी शताब्दी महोत्सवात शाळेच्या वाटचालीची सखोल माहिती दिली.व सांस्कृतिक कार्यक्रमात सुरुवात करण्यात आली. इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सुंदर कलाविष्कार सादर करत विविध गाण्यांवर आधारित नृत्य सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत माळी यांनी केले. शेवटी आभार संजय पाटील यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक ,शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.