नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुका व जिल्हा परिषद पोटनिवडणूकीसाठी जिंकण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नंदुरबार जिल्ह्याची राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकित दिले.तसेच या नंदुरबार जिल्ह्यात एका वर्षाच्या आत
राष्ट्रवादीचे जिल्हा कार्यालय बांधण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली नंदुरबार जिल्ह्याची आढावा बैठक झाली या आढावा बैठकीत प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे, प्रदेश उपाध्यक्ष मा. आ.उदेसिंग पाडवी, महिला अध्यक्ष ॲड. अश्विनीताई जोशी, युवक अध्यक्ष सिताराम पावरा, जिल्हा उपाध्यक्ष शांतीलाल साळी, जिल्हा उपाध्यक्ष मोहन शेवाळे, नंदुरबारचे शहराध्यक्ष नितीन जगताप, नंदुरबार तालुका अध्यक्ष प्रदीप वणा पाटील, जिल्हा उपाध्यक्ष बी.के. पाडवी, जिल्हा सरचिटणीस मधुकर देवराम पाटील, विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष बबलू कदमबांडे, आदिवासी सेलचे गुलाब आखाड्या नाईक, सामाजिक विभागाचे अध्यक्ष संजय खंदारे, शहादा शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर, तालुका अध्यक्ष माधवराव पंडितराव पाटील, संगीताताई पाडवी, युवती अध्यक्ष हर्षा देशमुख,अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष ॲड. दानिश पठाण आदी प्रमुख कार्यकर्ते त्या वेळी उपस्थित होते.
या बैठकीत उपमुख्यमंत्रीअजित पवार यांनी आगामी येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुका व जिल्हा परिषद पोटनिवडणूकसाठी सुरू असलेल्या तयारीचा आढावा घेत पक्षाची स्थिती जाणून घेतली. यावेळी जिल्हा निरीक्षक नाना महाले व जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजित मोरे यांना पक्षसंघटन मजबूत करण्याकरता बूथ कमिट्या त्वरित स्थापन करण्यात याव्या अशा सूचना दिल्या.नंदुरबार जिल्ह्यातील आगामी निवडणुकीमध्ये चांगले चांगले यश मिळवण्याकरता प्रयत्नशील राहा निवडणुकीतील यश हेच पक्षाची ताकद नेमकी काय हे दाखवत असतो असे सांगत माझ्या देखरेखीखाली विशेष लक्ष देऊन निवडणूक जिंकण्याचा सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या.
याचसोबत येत्या एका वर्षांमध्ये राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या नावाने असलेली नंदुरबार शहरातील एक प्लॉटवर एक भव्य राष्ट्रवादीचा जिल्हा कार्यालय बांधण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार संबंधित सर्व अधिकाऱ्यांना त्यांनी त्यांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांना सूचना देखील दिल्या एक चांगलं भव्य दिव्य अशा पद्धतीचा जिल्हा कार्यालय त्या नंदुरबार मध्ये उभा राहणार आहे. या बैठकीत दरम्यान कार्यकर्त्यांनी विकास कामांसाठी नंदुरबार जिल्ह्यावर विशेष लक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी द्यावा असा आग्रह धरला. त्याच वेळी उपस्थित विद्यमान नगरसेवकांनी शहादा येथे मुस्लिम समाजाचे कब्रस्थान साठी जागा मिळावी म्हणून ना.अजित पवारांना निवेदन दिलं, त्यांनी त्याची दखल घेत विविध अधिकारी यांना फोन करून सूचना दिल्या व कब्रस्थान साठी जागा मिळवून देण्यासाठी हालचाली करत मुस्लीम समाजाला कब्रस्तान देण्याचे आश्वासन पदाधिकाऱ्यांना दिले . या बैठकीत विविध पदाधिकारी यांनीbनंदुरबार जिल्ह्यातील अशासकीय कमिटी अजूनही नेमले जात नाही अशा पद्धतीची तक्रार या ठिकाणी केली. आणि त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालकमंत्री ॲड. के.सी. पाडवी यांच्याशी फोनवर संपर्क साधून सदर शासकीय कमिट्या त्वरित भरावे व त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना योग्य स्थान मिळावं अशा सूचना दिल्या.