नवापूर | प्रतिनिधी
नवापूर पालिकेतर्फे थकबाकी रक्कम शिल्लक असलेली १२ दुकानगाळे सिल करण्यात आली. वसुलीकामी सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी स्वप्निल मुधलवाडकर यांनी केले आहे.
नवापूर शहरात नगरपरिषदे मार्फत नागरीकांना सन २०२२ २०२३ या वर्षाची मागणी बिले वाटप करण्यात आलेली आहेत. बर्याच नागरीकांकडे मोठया प्रमाणावर थकबाकी रक्कम शिल्लक असल्याचे निर्दशानास आलेले आहे. तसेच नगरपालिका मालकीच्या दुकान गाळयातील दुकानांचे भाडे देखिल थकीत आहे. सदरचे दुकान गाळयांची भाडे वसुली तसेच मालमत्ताकर, पाणीकर व इतर करांची वसुलीचे काम सुरु असून ज्या नागरीकांकडे मोठया प्रमाणावर थकबाकी आहे.अश्या नागरीकांचे दुकानगाळे सिल करणे तसेच नळ कनेक्शन कट करण्याची कार्यवाही नगरपरिषदेने सुरु केलेली आहे.
नगरपरिषदेच्या दुकानगाळ्यांपैकी १२ दुकानगाळ्यांचे भाडे थकीत असल्याने सदर दुकाने नगरपरिषदेने सिल केलेले आहेत व यापुढे देखिल अशीच कारवाई नगरपरिषदे मार्फत सुरु राहील. नगरपरिषदेने वसुली पथकांची नेमणुक केलेली आहे. नागरीकांनी आपल्याकडे वसुलीसाठी आलेल्या पथकांकडे थकीत असलेली रक्कम भरुन रितसर पावती घेवुन नागरीकांनी वसुलीकामी सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी स्वप्निल मुधलवाडकर,प्रशासकीय अधिकारी अनिल सोनार यांनी केले आहे.