खापर l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत खापर येथील प्रभाग क्रमांक तीन मध्ये सर्वसाधारण जागेच्या मतदान यंत्रामधील पेपर सरकल्याने राज्य निवडणूक आयोगाने (ता.२3) रोजी फेरमतदान प्रक्रिया सकाळी ०७ ते ०५.३० पर्यंत पार पडली. यात ग्रामपंचायत परिवर्तन पॅनलच्या शोएब तेली ला ४१२ मत मिळवून सबका साथ सबका विकास पॅनलच्या आलमगीर बलोचा १५ मतांनी पराभाव केला असून आलमगीर बलोच यांना ३९७ मते मिळाली. फेरमतदाना नंतर सबका साथ सबका विकास पॅनलचे आता ११ सदस्य निवडली आहे तर ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे ६ सदस्य निवडून आली आहेत.
प्रभाग क्र. ३ मध्ये भाग अ ६४७ व ब ६४५ असे एकूण १२९२ मतदाते असून त्यापैकी ८१९ मतदात्यांनी आज आपला मतदानाचा हक्क बाजवला. झालेल्या फेरमतदाना नंतर सबका साथ सबका विकास पॅनलचे लोकनियुक्त सरपंच किरण जयसिंग पाडवी यांच्यासह सदस्य जैन ललिताबाई निलेश, वसावे देविदास जयसिंग, पवार प्रमिला छगन, पाडवी आशा विनायक, चौधरी वंदनाबाई दीपक, वसावे दक्षा देवेंद्रकुमार, पाडवी अंजना रोहिदास, कामे कविता विनोद, पाडवी संगीता किरण, कामे विनोद यशवंत, पाडवी अंजना विजय असे एकूण अकरा सदस्य निवडून आले आहेत .तर ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे सदस्य जाट ललित जगदीश, पाडवी अश्विन कृष्णा, पाडवी करुणा वासुदेव, पाडवी महेश चंदू, सदाराव प्रमिलाबाई शांतीलाल, तेली शोएब रशीद असे एकूण सहा सदस्य निवडून आले आहेत.
फेरमतदानात मिळालेली मते अशी
तेली शोएब रशीद : ४१२
बलोच आलमगीर सत्तार : ३९७
नोटा : १०