Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आदिवासी कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज मतदान

team by team
December 24, 2022
in राजकीय
0
आदिवासी कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज मतदान

नवापूर |  | प्रतिनिधी

तालुक्यातील डोकारे येथील आदिवासी सहकारी साखर कारखान्याच्या  संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूकीनिमित्त उद्या दि.२४ रोजी मतदान घेण्यात येणार आहे. यासाठी आज सार्वजनिक गुजराथी हायस्कुल येथून मतदान कर्मचारी एस.टी.बस व खाजगी वाहनाने रवाना झाले. निवडणूक शेतकरी विकास पॅनल व परिवर्तन पॅनलमध्ये सरळ लढत आहे.

 

 

आज सकाळी १० वाजता  मतदान कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण सहायक निवडणुक अधिकारी निरज चौधरी यांनी घेतले. मतदान कर्मचार्‍यांना मतदान साहित्य वाटप केले. कर्मचारी मतदान साहित्य तपासून आपापल्या बुथवर रवाना झाले. या मतदान कामासाठी १८० कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात नवापूर शहरात ६ मतदान बुथ, नवागाव ६, विसरवाडी ६, खांडबारा ४, नंदुरबार २ असे एकुण २४ मतदान बुथ असून आज सर्व मतदान कर्मचारी याकामी रवाना झाले आहेत.

 

 

 

संपुर्ण निवडणुकीवर निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा सहायक निबंधक अधिकारी भारती ठाकुर, सहाय्यक निवडणूक अधिकारी निरज चौधरी, क्षेत्रीय अधिकारी सचिन खैरनार, शितल महाले, शरद चौधरी आदी लक्ष ठेऊन आहेत.
या निवडणुकीचे मतदान २४ डिसेंबरला होणार आहे. मतमोजनी २५ डिसेंबरला सार्वजिक गुजराथी हायस्कुल येथे सकाळी साडेआठ पासून होणार आहे. मतदान हे मतपत्रिकेव्दारे होणार असल्याची माहिती सहायक निवडणूक अधिकारी निरज चौधरी यांनी दिली.

 

शेतकरी विकास पॅनलचे (चिन्ह रिक्षा) उमेदवार
नवागांव गटातून आ.शिरीषकुमार नाईक, विनोद नाईक, नवापूर गटातून नवलसिंग सिंगा गावित, दर्शन प्रताप पाटील, बापू सोमा गावित,विसरवाडी गटातून कांतीलाल महार्‍या गावित, नकट्या हुरजी गावित, खांडबारा गटातून  विजेसिंग लालजी गावित, वनसिंग सेदा गावित, नंदुरबार गटातून संजय पंडित कोकणी, अमरसिंग भामटू गावित, महिला गटातून विनाताई प्रतापसिंग वसावे, सयाबाई सुरुपसिंग नाईक, अनुसूचित जाती जमाती गटातून प्रभुदास जेसा गावित, भटक्या विमुक्त जाती फत्तेसिंग नरसिंग नाईकनिवडणुकीच्या रिंगणात आहेत.
संस्था या गटातून अजित सुरुपसिंग नाईक यांची बिनविरोध निवड झाली. इतर मागासवर्गातून आरीफभाई बलेसरिया यांची  बिनविरोध निवड झाली.

 

परिवर्तन पॅनलचे (चिन्ह: कपबशी) उमेदवार
नवागांव गटातून हरिदास जेसा गावीत, नवापूर गटातून आलु होण्या गावीत, देवराम वसंत गावीत, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत माणिकराव गावीत,विसरवाडी गटातून बकाराम फत्तेसिंग गावीत, रमेश जाण्या गावीत, खांडबारा गटातून लक्ष्मण धेडू कोकणी, रावजी कातक्या वळवी, नंदुरबार गटातून जगन चंद्रा कोकणी,  रुद्राबाई धरमसिंग वसावेमहिला गटातून मीराबाई पारत्या गावीत, संगीता भरत गावीत, अनुसूचित जाती जमाती गटातून सीताराम शंकर ठाकरे,भटक्या विमुक्त जाती रमेशचंद्र धनसुखलाल राणा.

बातमी शेअर करा
Previous Post

आधारभूत किमतीत कडधान्य खरेदीला 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ

Next Post

खापर येथे फेर मतदानात शोएब तेली १५ मतांनी विजयी

Next Post
खापर येथे फेर मतदानात शोएब तेली १५ मतांनी विजयी

खापर येथे फेर मतदानात शोएब तेली १५ मतांनी विजयी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add