नंदुरबार l
धडगाव तालुक्यातील गेंदा होळीपाडा येथे निवडणूकीत मतदान न केल्याच्या कारणावरुन तिघांना मारहाण केल्याप्रकरणी १० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, धडगाव तालुक्यातील गेंदा होळीपाडा येथील राहूल खात्र्या पावरा यांनी निवडणूकीत मतदान केले नाही. या कारणावरुन राहूल पावरा यांना रायसिंग जंगल्या पावरा, मदन कालसिंग पावरा हे तिघेजण हाताबुक्यांनी मारहाण करीत होते.
यावेळी राहूल पावरा यांचे काका रेहज्या पावरा व भाऊ विक्रम पावरा हे सोडविण्यासाठी गेले असता त्यांनाही गणपत जंगल्या पावरा, शिवाजी जंगल्या पावरा, प्रताप दमा पावरा, सिमा मालसिंग पावरा, रतन कालसिंग पावरा, दशरथ पावरा, आलश्या मालसिंग पावरा व सिपाडीबाई रतन पाडवी यांनी शिवीगाळ करीत हाताबुक्यांनी मारहाण केली व जिवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत राहूल पावरा यांच्या फिर्यादीवरुन धडगाव पोलिस ठाण्यात १० जणांविराधात भादंवि कलम ३२४, १४३, १४७, १४९, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.कालूसिंग पाडवी करीत आहेत.








