म्हसावद l प्रतिनिधी
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने नंदुरबार जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने नाशिक विभागीय शालेय कबड्डी स्पर्धा २०२२ च्या आजपासून दिनांक २३ डिसेंबर २०२२ रोजी शहादा तालुक्यातील मंदाणे येथील आदर्श विद्यालय येथे होणार आहे.अशा प्रकारची विभागीय क्रीडा स्पर्धच नियोजन प्रथमच नंदुरबार जिल्ह्याला मिळाले आहे आणि तो बहूमान शहादा तालुक्याला मंदाणे या गावाला मिळालेला आहे.
कबड्डी दिनांक २३ डिसेंबर २०२२ रोजी १४ वर्षां वयोगटातील मुले व मुली, दिनांक २४ डिसेंबर २०२२ रोजी १७ वर्ष वयोगटातील मुले व मुली आणि दिनांक २५ डिसेंबर २०२२ रोजी १९ वर्ष वयोगटातील मुले मुली यांची स्पर्धा होणार आहे याची सर्व जिल्हा व तालुका क्रिडा संयोजक व क्रीडा शिक्षक यांनी याची नोंद घ्यावी.तरी याचा बहूमान शहादा तालुक्याला मंदाणे या गावाला मिळालेला आहे तरी ह्या विभागीय कबड्डी क्रीडा स्पर्धा चा आनंद घ्यावा असे आवाहन स्पर्धा आयोजन समिती व तालुका क्रीडा संयोजक भालचंद्र चौधरी यांनी केले आहे.








