नवापूर l प्रतिनिधी
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य भरत गावित यांची जळगाव विद्यापीठाच्या सिनेट सदस्य पदासाठी बिनविरोध निवड झाली.
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य भरत गावित यांनी अनुसूचित जमाती प्रवर्गातून जळगाव विद्यापीठाच्या सिनेट सदस्य पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. भरत गावित यांचा एकमेव अर्ज असल्याने भरत गावित यांची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, अधिसभा (सिनेट) सदस्यपदी बिनविरोध निवड झाली.
जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व्यवस्थापन प्रतिनिधींच्या गटामधून अधिसभा (सिनेट) सदस्य पदासाठीच्या निवडणुकीसाठी विसरवाडी (ता. नवापूर) येथील विसरवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित सार्वजनिक कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे अध्यक्ष भरत गावित यांनी १६ डिसेंबरला अनुसूचित जमाती प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. याप्रसंगी प्रा. संदीप पाटील, प्रा. दिलीप पाटील, प्रा. नितीन माळी, प्रा. अविनाश बडगुजर आदी उपस्थित होते.
भाजपचे तालुकाध्यक्ष भरत गावित यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित, खासदार डॉ. हीना गावित, माजी आमदार शरद गावित, धनंजय गावित, जिल्हा परिषद सदस्या संगीता गावित, एजाज शेख, जयवंत जाधव, जयंतीलाल अग्रवाल, नगरसेवक महेंद्र दुसाने, हेमंत जाधव यांनी अभिनंदन केले.








