नंदूरबार l प्रतिनिधी
शहादा येथील मंदिर चोरीचा गुन्हा 24 तासात उघडकीस आणल्याबद्दल शहादावासीयांकडून जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्यासह पथकाचा सत्कार केला.
शहादा शहरातील श्री जिवनकुशल सुरी जैन, दादावाडी ट्रस्टचे श्री. सुघोषाघंट मंदिराचे दक्षिण भागातील दरवाज्याचे कडी-कोयंडा व कुलूप तोडून आत प्रवेश करून मंदिरातील 7 दान पेट्या उचलून मंदिराच्या पाठीमागे घेवून जावून त्या पेट्यांचे कुलूप कुठल्यातरी हत्याराने तोडून त्यामधील 1 लाख 30 हजार रूपये रोख रक्कम कोणीतरी अज्ञात चोटयाने चोरून नेली होते. त्याबाबत गणेश श्रीकृष्ण देशपांडे, रा. जैन मंदिर दादावाडी डोंगरगाव रोड, शहादा यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहादा पोलीस राहण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर व त्यांच्या पथकाने अत्यंत कमी वेळेत मध्यप्रदेश सारख्या राज्यात बातमीदारांचे जाळे तयार करुन संशयित आरोपी सुल्तान शेख रशिद शेख व सुरज नवलसिंग ठाकूर यांना मध्य प्रदेश राज्यात जावून बेड्या ठोकल्या आहेत. तसेच गुन्हयातील 81 हजार 310 रूपये रोख रक्कम हस्तगत देखील करण्यात आली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही आरोपीतांकडून महाराष्ट्रासह मध्य प्रदेश राज्यातील एकुण 12 गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
शहादा शहरातील श्री. जिवनकुशल सुरी जैन, दादावाडी ट्रस्टचे श्री. सुघोषाघंट मंदिराचे दक्षिण भागातील दरवाज्याचे कडी-कोयंडा व कुलूप तोडून मंदिरातील 07 दान पेट्यांचे कुलूप तोडून त्यामधील 1 लाख 30 हजार रूपये रोख रक्कम चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय गुन्हेगारांना नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर व त्यांच्या पथकाने मध्य प्रदेश राज्यात जावून 24 तासातच ताब्यात घेवून गुन्हा उघडकीस आणला म्हणून श्री. सुघोषाघंट मंदिर ट्रस्टी, कांतीलाल टाटीया, रमेश चोरडिया,सुमतीलाल खिंवसरा. कचरु नहाटा, प्रदिप नहाटा, महेंद्र खिंवसरा, रमेश खिंवसरा, सुभाष छाजेड, मारवाडी मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते, मकरंद पाटील,
हेमराज पवार, विनोद जैन, रमाशंकर माळी, जितेंद्र जमदाडे, मेहमूद खाटीक, मोहल्ला कमिटी सदस्य जुबेरभाई पठाण,मेहमुद खाटीक, अन्सार शेख, रशीद शेख, बशीर शेख, नईम शेख, रफिक शेख, तापी रेसीडेन्सी सोयटी शहादा येथील डॉ. मुकेश पाटील, रामेश्वर गगराणी, ओंकार माळी, दिपक लोहर, गजेंद्र चौधरी, निलेश पवार, व जैन बांधवांसह सर्व धर्मियांनी, शहरातील व्यापारी असोसीएशनचे प्रतिनिधी, विविध पक्ष कार्यकर्ते तसेच शहादा शहरातील नागरिकांनी व विविध मान्यवरांनी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, पोलीस उप निरीक्षक अनिल गोसावी, पोलीस हवालदार दिपक गोरे, पोलीस नाईक विकास कापुरे, पोलीस कॉन्सटेबल अभय राजपूत, शोएब शेख यांचे शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.
तसेच नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी. आर. पाटील यांचे नेतृत्वाखाली नंदुरबार जिल्हा पोलीस दल गुन्हे उघडकीस आणण्याच्या कामगिरीबद्दल तसेच समाजातील विविध घटकांसाठी राबवित असलेल्या विविध सामाजीक योजना याबाबत समाधान व्यक्त केले आहे. तसेच नंदुरबार पोलीसांच्या पुढील वाटचालीस व कामगिरीस शुभेच्छा दिल्या.








