अक्कलकुवा | प्रतिनिधी
श्री सम्मेदशिखर जैन महातीर्थला झारखंड सरकारने पर्यटन स्थळ घोषित केल्याच्या निषेधार्थ अक्कलकुवा तालुक्यातील सकल जैन समाज बांधवानी आपली दुकाने बंद करून भारत बंदला पाठिबा दिला. यावेळी मुकमोर्चा काढून झारखंड सरकारने घेतलेला सदर निर्णय मागे घेण्याची मागणी केली.

याबाबत अक्कलकुवा तालुका जैन समाजाचा वतीने तहसीलदार रामजी राठोड यांच्यामार्फत देशाच्या राष्ट्रपती व प्रधानमंत्री यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, जैन समाजाचे २४ तीर्थंकरपैकी २० तीर्थंकरांची व अनंत जैन संतांची निर्वाण भूमि असलेले झारखंड राज्यातील गिरिडीह जिल्ह्यातील जैन शाश्वत श्री समेद शिखर महातीर्थ ज्याला पारसनाथ पर्वत म्हणून ओळखले जाते. अश्या पवित्र तीर्थस्थानाला झारखंड सरकारचा अनुशासनाने केंद्रीय वन मंत्रालय द्वारा श्री समेद शिखर जैन तीर्थला पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे.
त्यामुळे सकल जैन अल्पसंख्यक समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. या तीर्थस्थानाच्या पवित्रतेला धोका निर्माण होणार आहे. जैन समाज हा अहिंसा परमो धर्म वर विश्वास ठेवणारा समाज असून श्री समेदशिखर तीर्थ है जैन समाजाचे पवित्र तीर्थस्थान आहे. त्याला पर्यटन स्थळ घोषित करणे चुकीचे असून तात्काळ सरकारने हा निर्णय मागे घ्यावा.या अगोदर विश्व जैन संघठन सह अनेक जैन संस्थांनी सरकारला मांस-मदिरा विक्रीमुक्त पारसनाथ पर्वत राज श्री समेदशिखर शिखर तीर्थ घोषित करण्यासाठी व पर्वत वंदना मार्गवर झालेले अतिक्रमण मुक्त करण्यासाठी याचिका दिली होती. परंतु जैन समाजाच्या मागण्यावर आतापर्यंत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही, हे अल्पसंख्यक जैन समाजावर अन्याय आहे. शाश्वत जैन तीर्थराज श्री समेदशिखर तीर्थ च्या संरक्षण पवित्रता आणि वेगळी ओळखसाठी देशव्यापी श्री समेदशिखर बचाओ आंदोलनाला सकल जैन समाज अक्कलकुवा तालुकातर्फे पाठींबा देण्यात आला. तात्काळ सरकार ने घेतलेला निर्णय मागे घ्यावा व श्री समेदशिखर तीर्थला जैन तीर्थस्थान घोषित करावे अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी दि.२१ डिसेंबर रोजी सकल जैन समाजातर्फे भारत बंदची हाक देण्यात आली होती. त्या अनुषंगाने अक्कलकुवा तालुक्यातही बंदला उत्तम प्रतिसाद देत तालुक्यातील अक्कलकुवा, खापर, वाण्याविहीर, मोलगी येथे सकल जैन समाज बांधवांनी आपली दुकाने, कार्यालये बंद ठेऊन सरकारचा निषेध केला आहे. समाजातील शाळेतील विद्यार्थ्यांनीही एक दिवस शाळेत न जाऊन निषेध नोंदविला. सदर जैन आराधना भवनापासून शहरातील मुख्य मार्गातून मुक्क रॅली काढून तहसील कार्यालय येथे प.पू.जैन मुनि जयचंद्रसागरजी म.सा. यांच्या उपस्थित तहसीलदार रामजी राठोड यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी श्री श्वेतांबर मूर्तिपूजक जैन संघ अक्कलकुवा अध्यक्ष प्रेमचंद जैन, वर्धमान स्थानकवासी जैन संघाचे अध्यक्ष भिकमचंद जैन, खापर जैन संघाचे अध्यक्ष सुरेशचंद जैन, वाण्याविहिर संघाचे अध्यक्ष मदनचंद जैन, मोलगीचे मांगीलाल जैन, खापर जैन संघाचे माजी अध्यक्ष मोहनलाल जैन, जीवनलाल जैन,रतनलाल जैन, सुरेश जैन, राजेन्द्र जैन, ब्रिजलाल जैन, रतनलाल जैन, अशोक जैन, खूबचंद जैन, दिलीप जैन, अरविंद जैन, भवरलाल जैन, विनोद जैन, हंसराज जैन, महेंद्र जैन, जवेरीलाल जैन, संजय जैन, किशोर जैन, मदनचंद जैन, खेतमल जैन, दिलीप जैन, दिनेश जैन, महावीर जैन, संतोष जैन, प्रकाश जैन, लूणकरण जैन, नरेश जैन, पवन जैन, मुकेश जैन, विजय जैन, कमलेश जैन, अंकुर जैन, विनोद जैन, निलेश जैन, राजेन्द्र जैन, पारसमल जैन, दिनेश जैन, संतोष जैन, रमेश जैन, विनोद जैन, स्वप्निल जैन, शांतिलाल जैन, शुभम जैन, पंकज जैन, मयूर जैन, नितिन जैन, अभी जैन, ऋषभ जैन जितेंद्र जैन, योगेश जैन, कुशल जैन, अक्षय जैन, सौरभ जैन, धनेश जैन, हर्षल जैन, आदीसह तालुक्यातील अक्कलकुवा, खापर, वाण्याविहीर, मोलगी येथील जैन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खरतरगच्छ युवा परिषदेतर्फे निवेदन
यावेळी अखिल भारतीय खरतरगच्छ युवा परिषद अंतर्गत अल्पसंख्यक प्रकोष्ठचे राष्ट्रीय संयोजक शुभम भंसाली यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, श्री समेद शिखर जैन तीर्थ हे सकल जैन समाजाचे आस्थेचे केंद्र आहे. झारखंड सरकारने तीर्थस्थानाला पर्यटनस्थळ म्हणून घोषित केलेला निर्णय मागे घ्यावा. गुजरात राज्यातील भावनगर जिल्ह्यातील पालीताना येथे जैन समाजाचे प्रथम तीर्थंकर श्री आदिनाथ भगवान यांची निर्वाण भूमि असून श्री शत्रुंजय महातीर्थवर काही समाज कटकांनी २६ नोव्हेंबर रोजी श्री आदिनाथ भगवान यांच्या अतिप्राचीन चरण पादुका खंडित करण्याचे महापाप केले आहे. त्यामुळे श्री सकल जैन समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. संबधित दोषी असलेल्या व्यक्तिंवर तत्काल कार्यवाही करूर कठोर शिक्षा व्हावी. श्री समेदशिखर महातीर्थ, श्री शेत्रुंजय महातीर्थ व श्री गिरनार महातीर्थवर अनेक वर्षापासून असामाजिक तत्वांकडून अतिक्रमण व विकास/पर्यटन स्थळाच्या नावाखाली अधीन करण्याचे षड्यंत्र देशात सुरु असून ते बंद व्हावे व जैन समाजाचे ह्या तिन्ही तीर्थ क्षेत्राला जैन तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करण्यात यावे व आणि तीर्थ क्षेत्राच्या आजु-बाजूच्या ५० कि.मी. क्षेत्रात मास-मदिरा विक्री बंदी करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.








