नंदुरबार l
नंदुरबार येथे नाभिक समाजबांधवांच्या युवकांवर हल्ला करुन झालेल्या मारहाणीच्या घटनेचा नंदुरबार शहर नाभिक समाज हितवर्धक संस्था, नंदुरबार नाभिक दुकानदार संघटना, नंदुरबार नाभिक युवा मंच व नंदुरबार नाभिक महिला मंडळाने निषेध नोंदविला आहे. हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना नाभिक समाजाने निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, नंदुरबार शहरातील कोकणीहिल येथे सुर्यवंशी हेअर आर्ट या दुकानात अनोळखी चार ते पाच जणांनी अनधिकृतपणे प्रवेश करुन कारण नसतांना दुकानाचे मालक दीपक भटु सुर्यवंशी, राकेश भटु सुर्यवंशी व दोन कारागिर या नाभिक समाजाच्या युवकांवर हल्ला केला. यावेळी प्राणघातक हल्ला करण्यात आल्याने नाभिक समाजातील चारही युवक जखमी झाले आहेत. या युवकांना हाताबुक्क्यांसह लाठ्या-काठ्यांनी मारहाण करुन जीवेठार मारण्याचा प्रयत्नही करण्यात आला. म्हणुन दुकानात जावुन हल्ला करीत नाभिक समाजाच्या युवकांना मारहाण झाल्याचा निषेध नंदुरबार शहर नाभिक समाज हितवर्धक संस्था, नंदुरबार नाभिक दुकानदार संघटना, नंदुरबार नाभिक युवा मंच व नंदुरबार नाभिक महिला मंडळाने निषेध नोंदविला आहे.

तसेच युवकांवर हल्ला करणार्या हल्लखोरांवर कठोर कारवाई करुन शासन करण्यात यावी. कारवाई होवुन न्याय न मिळाल्यास नाभिक समाजाकडून जिल्ह्याभरात आंदोलन करण्यात येईल, अशी मागणी नंदुरबार नाभिक दुकानदार संघटनेचे अध्यक्ष धनराज वरसाळे, ट्रस्टी अध्यक्ष नानाभाऊ शिरसाठ, सचिव सुनिल वरसाळे, शहराध्यक्ष दिलीप बोरसे, नगरसेवक किशोर सोनवणे, दिपक शिंदे, मोहन सुर्यवंशी, संजय सुर्यवंशी, विजय सुर्यवंशी, किशोर सैंदाणे, नारायण शिरसाठ, सागर मोरे, राकेश खोंडे, सुरेश शिंदे, पी.एल.बोरसे, निलेश भदाणे, पुंडलिक पवार, किशोर शिवराम सोनवणे, कृष्णा सुर्यवंशी, गोपाळ सोनवणे, संजय सुर्यवंशी, घनःश्याम नांदेडकर, ज्ञानेश्वर बोरसे, दुर्गेश शिरसाठ, भालचंद्र मंडलिक, दिलीप सुर्यवंशी, बबलु महाले, कृष्णा निकम, राहुल सुर्यवंशी, राहुल सोनवणे, प्रफुल्ल सुर्यवंशी, यतिन अहिरे, मनिष मंडलिक, उमेश वरसाळे, जयेश वरसाळे, अनिल महाले, प्रदिप अहिरे, रविंद्र सोनवणे, किरण सैंदाणे, मुकूंद जगदाळे, जयेश सोनवणे, महेश सोनवणे, हर्षल सोनवणे, राकेश महाले आदींनी निवेदनातून केली आहे.








