नंदूरबार l प्रतिनिधी
एस.ए.मिनिस्ट्रीज ट्रस्ट,नंदुरबार संचलित एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय गणित दिवस साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या प्राचार्य नूतनवर्षा वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या वेळी श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी गणित शिक्षक गौतम सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना समोर प्रस्ताविक सादर करताना म्हटले की, दैनंदिन जीवनातील गणिताचे महत्त्व अनन्य साधारण आहे प्रत्येक कार्यात गणित विषय आपली भूमिका बजावत असते गणित शिवाय, कोणतेही व्यवहारातील कार्य पूर्ण होणे शक्य नाही, तसेच थोर भारतीय गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवनाविषयी परिचय दिला त्यांनी हार्डी रामानुजन नंबर 1729 याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली.

यावेळी त्यांनी गणितोत्सव विषयानातंर्गत गणितय परिपाठ आणि गणित तज्ञांच्या रंजक गोष्टी विद्यार्थ्यांनी सांगितल्या यामध्ये जवळपास 13 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. यामध्ये जितीन गावित (इयत्ता आठवी अ) आणि तनिषा पाडवी (इयत्ता आठवी ब) च्या विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे विद्यार्थ्यांसमोर रामानुजन व भट्टाचार्य यांच्या विषयी माहिती विद्यार्थ्यांना दिली.यावेळी परिसरातील गणित या विषयांतर्गत वर्गाचे क्षेत्रफळ, मुले व मुली यांचे गुणोत्तर काढणे व भौमितिक आकार याबाबत विद्यार्थ्यांना गौतम सोनवणे यांनी माहिती दिली. तसेच गणित पेटीची ओळख राठोड सरांनी करून दिली त्यातील विविध साहित्यांचे कार्य, त्यांचा होणारा उपयोग याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आणि गणितातल्या गमती जमती वरील उदाहरणे स्वप्नील पाटील विद्यार्थ्यांसमोर मांडल्या.

यावेळी अध्यक्षीय भाषणात शाळेच्या प्राचार्य यांनी आपले मनोगत मांडले यामध्ये गणित विषयाला न घाबरता त्याच्याकडे आवडीचा विषय म्हणून बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन विद्यार्थ्यांनी ठेवावा. ह्या वेळी पुस्तकांचे प्रदर्शन विद्यार्थ्यांसमोर मांडण्यात आले यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध पुस्तकांबद्दल माहिती विषय शिक्षकांकडून जाणून घेतली. शाळेच्या प्राचार्य नूतनवर्षां वळवी,मुख्याध्यापक विजय पवार, पर्यवेक्षिका वंदना जांबिलसा, पर्यवेक्षक मीनल वळवी, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक सी.पी बोरसे, ज्येष्ठ शिक्षक अरुण गर्गे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंदना जांबिलसा यांनी केले.तर आभार प्रदर्शन गुलाब राठोड यांनी मानले यावेळेस सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.








