Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा : पोलीस अधीक्षकांनी केला सत्कार

team by team
December 21, 2022
in सामाजिक
0
रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा : पोलीस अधीक्षकांनी केला सत्कार
नंदूरबार l प्रतिनिधी
उधना येथील महिलेची पर्स रिक्षात राहिली.रिक्षा चालकाने ती प्रामाणिक पणे परत केल्यामुळे  पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी रिक्षा चालकाचा  सत्कार केला.
 याबाबत अधिक माहिती अशी की, 21 डिसेंबर रोजी रुपाली रामचंद्र धनगर, रा. उधना, सुरत, ही महिला पतीसह नंदुरबार येथे आल्या होत्या. त्यानंतर त्या बस स्थानक, नंदुरबार येथे उतरून बस स्थानकाजवळच असलेल्या रिक्षा स्टॉपवरून एका रिक्षात बसून करण चौफुली, नंदुरबार येथे गेल्या. तेथे रिक्षातून उतरल्यानंतर त्यांनी रिक्षा चालकास भाड्याचे पैसे दिले. त्यानंतर सदर रिक्षा चालक हा तेथून निघून गेला. काही वेळातच रुपाली धनगर यांचे लक्षात आले की, त्यांच्याजवळ असलेली त्यांची पर्स व त्यामध्ये असलेले 3 हजार रुपये रोख रक्कम व 17 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत ही रिक्षामध्येच राहून गेली आहे. त्यामुळे सदर प्रवासी महिला या त्यांच्या पतीसह तात्काळ नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात आल्या. त्यांनी वरप्रमाणे घडलेली हकीगत ही नंदुरबार शहर पोलीस ठाणेचे पोलीस ठाणे अंमलदार म्हणून कर्तव्यावर असलेले पोलीस हवालदार वसंत वसावे यांना सांगितली.
त्यानंतर पोलीस हवालदार वसावे यांनी सदर बाब ही तात्काळ नंदुरबार शहर पोलीस ठाणेचे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक  प्रतापसिंग मोहिते यांना कळविली. त्यावर श्री. मोहिते यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीस अधीक्षक, नंदुरबार पी. आर. पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी, नंदुरबार  सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ नंदुरबार शहर पोलीस ठाणेचे सहा. पोलीस उप निरीक्षक कृष्णा पवार, पोलीस नाईक बलविंदर ईशी, स्वप्नील शिरसाठ, पोलीस शिपाई अफसर शहा अशांना तक्रारदार यांचे पतीसोबत बस स्थानक, नंदुरबार येथील रिक्षा स्टापवर तपासकामी पाठविले. त्या ठिकाणी पोलीसांनी DSK मार्केट परिसरातील CCTV फुटेजची पाहणी केली. त्याआधारे वरील नमुद महिला व तिचे पती हे ज्या रिक्षात बसले होते.
ती रिक्षा पोलीसांनी निष्पन्न केली. सदर रिक्षाचा शोध घेतला असता ती रिक्षा रेल्वे स्टेशन परिसरात मिळून आली. तेव्हा रिक्षाचे चालकास पोलीसांनी प्रवासी महिलेच्या पर्सबाबत विचारणा केली असता, रिक्षा चालकाने त्यांची रिक्षात अनावधानाने राहून गेलली पर्स सांभाळून ठेवली असल्याचे पोलीसांना कळविले. त्यानंतर रिक्षा चालकाने प्रवासी महिलेची पर्स नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात येवून समक्ष हजर केली. त्या पर्सची प्रवासी महिलेने समक्ष पाहणी केल्यावर त्यामध्ये 3 हजार रुपये रोख रक्कम व 17 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत असा एकूण 96 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल त्यांना सुस्थितीत मिळून आला.
त्यानंतर प्रवासी महिला रुपाली धनगर हिचा वरील प्रमाणे मिळून आलेले 3 हजार रुपये रोख रक्कम व 17 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत असा एकूण 96  हजाराचा ऐवज त्यांना सुपूर्द केला आहे. मुद्देमाल परत करीत असतांना प्रवासी महिलेच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले व तिचा वरील प्रमाणे ऐवज असलेली पर्स तिला पोलीसांनी एका तासातच परत मिळवून दिल्याने तिने पोलीसांचे मनःपूर्वक आभार मानले आहे. त्यानंतर आज रोजी रिक्षाचालक देवेंद्रसिंग राजूसिंग परदेशी, रा. परदेशीपुरा, नंदुरबार यांच्या प्रामाणीकपणाबद्दल व नंदुरबार शहर पोलीस ठाणे अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक प्रतापसिंग मोहिते, सहा. पोलीस उप निरीक्षक कृष्णा पवार, पोलीस नाईक बलविंदर ईशी, स्वप्नील शिरसाठ, पोलीस शिपाई अफसर शहा यांनी केलेल्या कामाचे कौतुक म्हणून पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सर्वांचे पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावून त्यांना पुष्पगुच्छ देवून त्यांचे अभिनंदन केले.
बातमी शेअर करा
Previous Post

शहादा मंदिर चोरी 24 तासात उघड, आंतरराज्यीय गुन्हेगार जेरबंद ! स्थानिक गुन्हे शाखेची कामगीरी

Next Post

शालेय विभागीय खो-खो क्रीडा स्पर्धेत नाशिक विजेता व नंदुरबार उपविजेता

Next Post
शालेय विभागीय खो-खो क्रीडा स्पर्धेत नाशिक विजेता व नंदुरबार उपविजेता

शालेय विभागीय खो-खो क्रीडा स्पर्धेत नाशिक विजेता व नंदुरबार उपविजेता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add