नदुरबार | प्रतिनिधी
जिल्हयातील ११ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व सिद्ध केल्याचा दावा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सचिव ॲड.राऊ मोरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा हे खडकी येथील सरपंचपदी निवडून आले आहेत. ९ पैकी ७ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे सरपंच निवडून आले आहेत. खडकी सरपंचपदी सिताराम नूरला पावरा, झापी सरपंचपदी गिता भरसिंग पावरा, भादल सरपंचपदी भुरका मास्तर पावरा, सिंधीदिगर सरपंचपदी सोमाबाई संदीप पावरा, बाबरी सरपंचपदी सैमाल सरदार पावरा उडद्या सरपंचपदी लावीबाई शिवाजी पावरा, तोरणमाळ सरपंचपदी इंदाबाई सायसिंग चौधरी हे राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले आहेत.
शहादा तालुक्यातील बिलाडी ( तह) येथे पॅनल प्रमुख राजू वारसिंग ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सौ. धृपदाबाई चैत्राम पवार हे लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आले. सदर ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये युवा नेते ॲड. राऊ बाबा मोरे, सुरेंद्र कुवर माधवराव पाटील, ॲड.. प्रकाश भोई, गजानन वसावे, रामसिंग वसावे आदींनी विशेष प्रयत्न केले.
निवडून आलेल्या सर्व सरपंचांचे आणि नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे, युवक अध्यक्ष सीताराम पावरा, माजी आ. उदेसिंग पाडवी, ॲड.राऊ मोरे, जि. प. सदस्य मोहन शेवाळे यांनी अभिनंदन केले.








