म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील म्हसावद येथील ग्रुपग्रामपंचायत ची सार्वत्रिक मतदान शांततेत पार पडली. 20 डिसेंम्बर रोजी सकाळी 10 वाजता मत मोजणी ला सुरुवात झाली यात अंबालाल अशोक पाटील यांचे लोकशाही पॅनलचे एकूण 11 सदस्य निवडून आले तर डॉ.भगवान खुशाल पाटील यांचे ग्राम विकास पॅनलचे सहा सदस्य व लोकनियुक्त सरपंच निवडून आले आहेत.
म्हसावद गावात एकूण 17 सदस्य ची निवडणूक तर लोकनियुक्त सरपंच ची निवडणूक मतदान पार पडली.ग्राम विकास पॅनल चे युवराज उत्तम ठाकरे याना 2354 मते मिळून लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आले. तरअंबालाल अशोक पाटील यांचे लोकशाही पॅनल चे ऊषाबाई मंगू पवार 432,सिंधुबाई रतीलाल शेमळे 474,छाया रजनीकांत सूर्यवंशी 548,चिंतामण उत्तम धनगर 559,
विमलबाई वसंत मोरे 520,सविता अंबालाल पाटील 524,भीमसिंग प्रतापसिंग सुकळे 361,गायत्री विजय अहिरे 468,स्नेहा सचिन बेदमुथा 480,मागं शंकर भिल 416,सचिन किशोर बेदमथा 342,शांतीबाई मोत्या भिल 301 तर.भगवान खुशाल पाटील ग्राम विकास पॅनल चे बिंदा रिवन ठाकरे 550,प्रकाश खुशाल पाटील 550,अशोक भगवान धनगर 494,रंजना सावन पवार 481,पमाबाई तारसिंग सुकळे 437,अक्काबाई रमेश ठाकरे 360 असे उमेदवार निवडून आले .








