नवापूर l प्रतिनिधी
तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींचा निकाल आज जाहीर झाला. यात गंगापूर ही ग्रामपंचायत आधीच बिनविरोध झाली होती. १६ पैकी कोणत्या ग्रामपंचायती काँग्रेसच्या, राष्ट्रवादी काँग्रेसच्या की भाजपच्या याबाबत कोणीही ठाम दावा केला नाही. निवडून आलेल्या सरपंच व सदस्यांनी देखिल याबाबत बोलणे टाळले. तर काँग्रेसने १० भाजपाने ९ शिवसेना शिंदे गटाने दोन ग्रामपंचायतीवर दावा केला आहे.
काल सकाळी दहाला तहसीलदार कार्यालयात मतमोजणीला सुरवात झाली. पंधरा ग्रामपंचायतींचा दोन टप्प्यात मतमोजणी दुपारी साडेबारा पर्यंत झाली. तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी निकाल जाहीर केले.
ग्रामपंचायत आणि नवनियुक्त सरपंच असे
गंगापूर : निकिता शैलेश वसावे , शेही : संगिता प्रकाश कोकणी , शेगवे : रमिला करणसिंग पाडवी.बेडकी : निर्मला विनायक गावित,
पाटी : रशिला तुषार वळवी, करंजवेल : ईल्पेश गणपत वसावे , वाटवी : वता विल्पेश वळवी, नानगीपाडा :पल्लवी तुकाराम गावित, विसरवाडी : यशस्विनी दिपेश गावित, खेकडा : अमिषा अर्जुन मावची, अंठीपाडा : जयदीप मगन वसावे, वावडी : बाजूबाई भुपेंद्र वसावे
वऱ्हाडीपाडा : रामदास महादू गावीत, भांगरपाडा : यशोदा जयंत पाडवी , खडकी: शिल्पा अंकुश गावीत, वाटवी ( खांडबारा) : अरुणा विलास कोकणी
सकाळपासूनच १६ ग्रामपंचायतचे ग्रामस्थांनी तहसील कार्यालयासमोर गर्दी केली होती. निकाल लागत गेले तसा विजयी उमेदवार आणि समर्थकांनी जल्लोष साजरा केला. पहिल्या फेरीमध्ये ८ ग्रामपंचायत तर दुसऱ्या फेरीत ७ ग्रामपंचायत असा निकाल जाहीर झाला. १६ ग्रामपंचायत पैकी गंगापूर ग्रामपंचायत बिनविरोध झाली होती, काल फक्त १५ ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर करण्यात आले. सकाळी १० वाजता तहसील कार्यालयात मतमोजणीला सुरुवात झाली टप्प्याटप्प्याने उमेदवारांना पोलीस प्रवेशद्वारा जवळ उभे राहून सोडत होती. या ग्रामपंचायतीच्या मतमोजणी प्रसंगी तहसीलदार मंदार कुलकर्णी, नायब तहसीलदार जितेंद्र पाडवी, सुरेखा जगताप, मिलिंद कुलकर्णी लक्ष ठेवून होते.
या मतमोजणीच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज पाटील अशोक मोकळ विसरवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील व पोलीस कर्मचारी लक्ष ठेवून होते.








