नंदूरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतीपैकी २२ ग्रामपंचायतीवर शिवसेना शिंदे गटाने तर काँग्रेसने १६ ग्रा.पं.वर वर्चस्वाचा दावा केला आहे.
तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणुक जाहीर झाल्यानंतर माघारीअंती तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित ४४ ग्रामपंचायतीसाठी प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले. आज तहसील कार्यालयाच्या आवारात सकाळी १० वाजता मतमोजणीस सुरुवात करण्यात आली. यात सर्वाधिक २२ ग्रामपंचायतीवर येथील जि. प. सदस्य तथा शिवसेना शिंदे गटाचे नेते विजयसिंग पराडके, शिक्षण सभापती गणेश पराडके, तसेच जि.प.सदस्य रवींद्र पराडके गटाचे सरपंच निवडून आल्याचा दावा करण्यात आला आहे. २१ ग्रामपंचायतींवर काँग्रेस, ७ ग्रामपंचायतीवर भाजपा व २ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दावा केला आहे. विशेष म्हणजे सार्वत्रिक निवडणूक झालेल्या ४७ ग्रामपंचायती ह्या नव्याने स्थापन झालेल्या आहेत. यात शिवसेनेचे नेते विजयसिंग पराडके यांच्यावर विश्वास दाखवत नागरिकांनी सर्वाधिक ग्रामपंचायतीवर शिवसेनेच्या ताब्यात दिल्याने शिवसेनेच्या गोटात उत्साह दिसून आला. जसजसा निकाल जाहीर होत होता तसतसा उमेदवारमध्ये जल्लोष होत होता. दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. मतमोजणी प्रक्रिया शांततेत पर पडली.
ईश्वर चिठ्ठीने निवड
४ ग्रामपंचायतींमध्ये एक एक वार्डात सदस्यांना समान मतदान झाल्याने ईश्वर चिट्ठीने सदस्य निवडण्यात आहे. गौऱ्या येथे वार्ड २ मध्ये ज्योती कुवरसिंग पराडके व संगीता मोहन पराडके, कामोद खु मध्ये संजय फोपऱ्या पावरा व विजय महाऱ्या पावरा, चांदसैली ग्रामपंचायतीमध्ये रमेश सामा वसावे व हान्या वाड्या वसावे तसेच थुवानी ग्रामपंचायत वार्ड क्रमांक १ मध्ये जनता मगन पाडवी व मालती अर्जुन पाडवी यांना समसमान मते मिळाली. त्यामुळे ईश्वर चिट्ठी काढून सदस्य निवडण्यात आले. यात ज्योती कुवरसिंग पराडके, विजय महाऱ्या पावरा, रमेश सामा वसावे व मालती अर्जुन पाडवी हे उमेदवार विजयी झाले.

शिंदे गटाने दावा केलेल्या ग्रामपंचायती
गेंदा, शेलदा, वावी, कुंभरी, पिंपळबारी, राजबर्डी, त्रिशूल, कुकतार, कामोद खु, मांडवी बु, बिजरी, बिलगाव, भाबरी, अट्टी, जुगणी, कात्रा, तेलखडी, थुवाणी, रोषममाळ खु.फलाई, कुंड्या, कुवरखेत.

काँग्रेसने दावा केलेल्या ग्रामपंचायती
माळ, सिरसानी, सावऱ्या, खडकला, वलवाल, निगदी, खुटवडा, मांडवी खु, चिखली, बोदला, दुट्टल, डोमखेडी, भमाना, झापी, उडद्या, चांदसैली.

भाजपने दावा केलेल्या ग्रामपंचायती
तोरणमाळ, शेलकुवी, मक्तरझिरा, गौऱ्या, कुकलट, केलापाणी, सिंधीदीगर.
राष्ट्रवादीने दावा केलेल्या ग्रामपंचायती
खडकी, भादल.झापी,तोरणमाळ, भाबरी,उडद्या, सिंधीदीगर.








