नंदूरबार l प्रतिनिधी
विखरण ता. नंदुरबार येथील सुपुत्र ,माध्यमिक विद्यालय खोक्राळे येथील मुख्याध्यापक एस.जी.सैंदाणे यांचा मुलगा रोनक संजय पाटील हा उच्च शिक्षणासाठी कॅनडा येथे रवाना झाला.
रोनक पाटील यांचे शिक्षण हे अहमदाबाद येथे दि न्यू लिटल फ्लावर प्रायमरी शिक्षण झालं , माध्यमिक शिक्षण हे नंदुरबार येथील पीजी पब्लिक स्कूल या ठिकाणी केलं नंतर नाशिक येथील संदीप युनिव्हर्सिटी इंजीनियरिंग कॉलेज नाशिक या युनिव्हर्सिटी मध्ये कॉम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग या ठिकाणी बीटेक पर्यंत पदवी घेतली. नंतर त्यांनी बडोदा येथील आंतरराष्ट्रीय परीक्षा I.E.LT.S दिली. त्यात त्याने यशस्वी असे प्रयत्न करून तो त्या ठिकाणी उत्तीर्ण झाला आणि कॅनडा येथे पुढील शिक्षणासाठी प्रवेश मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले .
कॅनडा येथील कोलेस्टोगा कॉलेज या ठिकाणी प्रवेश मिळवला कोलेस्टोगा कॉलेज मध्ये “क्लाऊड डाटा मॅनेजमेंट” या कोर्ससाठी त्याची निवड झाली त्या युनिव्हर्सिटी प्रवेश मिळून आज रोजी तो कॅनडा येथे अहमदाबाद एअरपोर्टवरून तो रवाना झाला.पुढील शिक्षणासाठी रवाना होत आहे. सदर या सर्व शिक्षणासाठी आमच्या काकेश्वर विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष भास्कर हिरामण पाटील भालेर यांची प्रेरणा व मार्गदर्शन व मदत नेहमीच लाभली.








