नंदुरबार l
येथील सरदार पटेल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अभिनव विद्यालयातील विद्यार्थी खेळाडूंनी जिल्हास्तरीय विविध खेळांच्या स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. या स्पर्धेतील यशस्वी अभिनव विद्यालयातील विद्यार्थ्यांची विभागस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
क्रीडा युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा विभागामार्फत आयोजित शालेय जिल्हास्तरीय विविध खेळांची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत अभिनव विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. त्यात जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत सादिकबेग मिर्झा व देव जाधव यांची निवड विभागीय स्तरावर झाली. जिल्हास्तरीय नेटबाँल स्पर्धेत मुलाच्या 14 व 17 वयोगटातील व मुलीच्या 14 वयोगटातील संघ विभागीय स्तरावर निवडला गेला ,जिल्हास्तरीय डॉजबॉल स्पर्धेत मुलाच्या 17 वर्षातील वयोगटातील व मुलीच्या 19 या वयोगटातील संघ , जिल्हास्तरीय रोपस्किपिंग स्पर्धेत मुलांच्या 14, 17 व 19 वयोगटातील तर मुलींच्या 17 व 19या वयोगटातील खेळाडू संघात निवडले गेले ,
जिल्हास्तरीय रस्सीखेच स्पर्धेत मुलांच्या 17 व 19 या वयोगटातील व मुलीच्या 19 या गटातील संघ, जिल्हास्तरीय आट्यापाट्या स्पर्धेत मुलाच्या 19 या वयोगटातील व मुलीच्या 14 या वयोगटातील संघ विभागीय स्पर्धेसाठी निवडले गेले.142 विद्यार्थी विविध स्पर्धेत विभागीय स्पर्धेत निवडले गेले. यशस्वी खेळाडूंना क्रीडा शिक्षक संजय पाटील, रमेश मलखेडे, रामकृष्ण आघाव, पंकज आहिरे, युवराज पाटील, धनराज अहिरे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वितांचे संस्थेचे सचिव डॉ.राजाराम पाटील, संस्थेचे शालेय समिती चेअरमन ॲड. प्रभाकर चौधरी, संस्थेचे समन्वय प्रमोद पाटील, प्राचार्य तारकेश्वर पटेल, पर्यवेक्षक राजीव संगपाळ व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.








