म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील म्हसावद येथील ग्रुप ग्रामपंचायत ची सार्वत्रिक निवडणूक ही आज 18 तारखेला होत असून एकूण 6662 मतदार हे मतदानाचा हक्क बाजाविणार आहे.
ही निवडणूक ही गावातील एकूण सहा वार्डातुन होत आहे यात सरपंच पदासाठी एकूण सहा उमेदवार असून 17 सदस्य साठी दोन्ही पॅनल चे एकूण 17 प्रमाणे सरळ लढत आहे तसेंच दोन सरपंच पॅनल चे असून बाकी उर्वरित तीन उमेदवार हे अपक्ष आहेत.लोकशाही पॅनल चे एकूण 17 तर ग्राम विकास पॅनल चे 17 आहेत तर अपक्ष सदस्य पाच आहेत यात वार्ड क्र.3 येथे एक,वार्ड क्र.4 येथे एक.वार्ड क्र.5 येथे दोन तर वार्ड क्र.6 येथे एक असे एकूण पाच उमेदवार आहेत.
तसेच यात एकूण सरपंच पदासाठी पाच तर सदस्य पदासाठी 34 व पाच अपक्ष असे एकूण 39 उमेदवार निवडणूकिव्हा रिंगणात उभे आहेत यात कोणता पॅनल चा विजय होतो तर कोणता अपक्ष उमेदवार निवडून येतो ते सर्व मतदान मोजणी च्या दिवशी समजेल. मतमोजणी ही लगेच 20 डिसेंबर रोजी होणार आहे.
यात वार्ड क्र.1 येथे 1062,वार्ड क्र.2 येथे 1313,वार्ड क्र.3 येथे 821,वार्ड क्र.4 येथे 1103,वार्ड क्र.5 येथे 1232,वार्ड क्र.6 येथे 1031, असे एकूण 6662 मतदार आहेत.मतदान जिल्हा परिषद शाळा,साईबाबा कन्या हायस्कुल येथे होणार आहेत








