नवापूर | श.प्र. –
नवापूर तालुका ग्रामीण भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष भरत गावीत यांचे जय आदिवासी संपर्क कार्यालयाचे उद्घाटन समाजिक कार्यकर्ते रणजीत गावीत व आयुब गावीत यांच्या हस्ते फित कापून व श्रीफळ फोडुन करण्यात आले.
यावेळी भरत गावीत, अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष एजाज शेख, जि.प.सदस्य सुनिल गावीत, माजी पं.स सभापती दिलीप गावीत, रवी गावीत, माजी सरपंच हळदानी बिपिन गावीत, अरविंद गावीत, जयवंत जाधव, जैन्या गावीत, सुरेश गावीत, सुनिल गावीत, सुभाष गावीत सह भाजपचे पदधिकारी उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीचे कार्यालय हे एस.टी.आगार विभागाच्या बाजुला सुरु केले असून कार्यालयात शेतकरी सन्मान निधी, पिक कर्ज यासह सर्व जनसेवेचे कामे निःशुल्क करण्यात येणार असल्याची माहिती माजी पं.स. सभापती दिलीप गावीत यांनी दिली.