नंदूरबार l प्रतिनिधी
डिजिटल डिटॉक्स व वेलनेस इनोग्रेशन ही एक नवीन व नाविन्यपूर्ण संकल्पना आहे. ही संकल्पना घेऊन डॉ.रेखा चौधरी या जगभरातील विविध देशांमध्ये प्रबोधनाचे काम करत आहेत आज आपण पाहत आहोत की विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात सामाजिक उपक्रम कमी व टेक्नॉलॉजीचे उपक्रम जास्त झाले आहेत व आपण सर्वजण तसेच येणारे पिढी त्याच्या आहारी जात आहे.
याचे भान ओळखत जगभरात सुरू असलेला हा वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स व वेलनेस ईनोग्रेशन चा उपक्रम भारतात आपल्या नंदुरबार जिल्ह्यातून सुरू होत आहे की आपल्यासाठी आनंदाची बाब आहे असे मनोगत जिल्हाधिकारी श्रीमती मनीषा खत्री यांनी हिरा प्रतिष्ठान येथे डिजिटल डिटॉक्स डे व वेलनेस इनोग्रेशन सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.
पुढे त्यांनी आपल्या भाषणातून कार्यक्रमाच्या संयोजक भारताच्या वेलनेस ब्रँड ॲम्बेसेडर डॉ. रेखा चौधरी यांच्या कार्याचे कौतुक व अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून उपस्थित अमळनेर विधानसभेचे माजी आमदार तथा हिरा प्रतिष्ठान संस्थेचे उपाध्यक्ष शिरीष चौधरी यांनी आपल्या भाषणातून जागतिक स्तरावरचे विषय नंदुरबार सारख्या आदिवासी जिल्ह्यात घेऊन येत त्याविषयी प्रबोधन करणाऱ्या भारताच्या वेलनेस ब्रँड ॲम्बेसेडर डॉ. रेखा चौधरी यांच्या कार्याचे कौतुक केले.पुढे त्यांनी आपल्या भाषणातून मोबाईल व सोशल मीडिया याचे होणारे दुष्परिणाम व त्यांच्या आहारी जाणारी नवीन पिढी त्यांच्या वर्तनात झालेला बदल त्यामुळे होणारे नुकसान याचे महत्त्व पटवून देत बौद्धिक विकासासोबत शारीरिक विकास किती गरजेचा आहे.
याचे महत्त्व तसेच विद्यार्थ्यांनी व पालकांनी डिजिटल डिटॉक्स ही संकल्पना समजून घेणे व त्यानुसार बदल करणे ही काळाची गरज आहे असे आवाहन केले.
कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख मान्यवर हिरा प्रतिष्ठान संस्थेच्या संचालिका सौ.वंदना चौधरी,सौ.अनिता चौधरी.श्रीमती.डी.आर. हायस्कूलचे प्राचार्य एन. के.भदाणे, महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डी.एस. पाटील,हिरा प्रतिष्ठान संस्थेचे सचिव रुपेश चौधरी यांनी
आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना मोबाईलचे होणारे दुष्परिणाम व मोबाईल मुळे मानवी वर्तनात कसा बदल होत गेला त्यामुळे पुढील पिढीचे झालेले सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील नुकसान याचे काम करताना येणारे अनुभव याविषयी मार्गदर्शन केले.
तसेच हा बदल त्वरित होणारा नसून तो हळू हळू होईल यासाठी योगा, प्राणायाम व अध्यात्मिक ज्ञान हेसुद्धा महत्त्वाचे आहे याविषयी मार्गदर्शन केले तसेच भारताच्या वेलनेस ब्रँड ॲम्बेसिडर डॉ. रेखा चौधरी यांनी एक ज्वलंत प्रश्न घेऊन त्यावर सुरू केलेले सामाजिक प्रबोधनाचे काम हे कौतुकास्पद व वाखाणण्याजोगे आहे असे मनोगतातून व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारताच्या वेलनेस ब्रँड ॲम्बेसेडर तसेच कार्यक्रमाच्या संयोजक डॉ.रेखा चौधरी यांनी केले. प्रास्ताविकेतून त्यांनी वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स इनोग्रेशन या कार्यक्रमाची संकल्पना,उद्दिष्ट, गरज व सुरू असलेले कार्य याविषयी माहिती दिली व या कार्यक्रमाची सुरुवात आदिवासी व दुर्गम अशा आपल्या नंदुरबार जिल्ह्यातून हिरा प्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेच्या अधिनिस्त सर्व शाळा व महाविद्यालय येथे झाली याविषयी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमासाठी सहकार महर्षी श्री.अण्णासाहेब पि.के.पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सुरेंद्र पाटील,सौ. इंदुबाई हिरालाल चौधरी प्राथमिक विद्या मंदिराचे मुख्याध्यापक किरण त्रिवेदी, एस.ए.मिशन हायस्कूलचे उपप्राचार्य श्री.पवार आदी मान्यवर तसेच पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल चौधरी व आभार प्रदर्शन युवराज भामरे यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हिरा प्रतिष्ठान अधिनिस्त सर्व विद्यालयाचे व महाविद्यालयाचे प्राध्यापक,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.