नवापूर l प्रतिनिधी
माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री स्व माणिकरावजी गावीत यांच्या स्मरणार्थ नवापूर तालुका भाजपाच्या
वतीने भरत गावीत यांच्या तर्फे नवापूर नगरपरिषदेच्या अमरधामास (स्मशानभूमी) दाह संस्कार करण्यासाठी जळाऊ लाकुड स्विकृतीबाबत चे निवेदन भारतीय जनता पार्टीतर्फे मुख्यधिकारी सप्निल मुधलवाडकर यांना देण्यात आले.यावेळी भारतीय जनता पाटीचे सर्व पदधिकारी उपस्थित होते.
त्यांनी निवेदना मध्ये म्हटले आहे नवापूर नगरपरिषद हद्दीतील तिनटेंबा भागातील हिंदु बांधवांच्या स्मशानभूमी (अमरधाम) या ठिकाणी हिंदु बांधवांच्या मरणोत्तर दाह संस्कार करण्यासाठी जळाऊ लाकुड उपयोगात येत असते. दाह संस्कार करण्यासाठी जळाऊ लाकुड अंदाजित वजन ५ टन एवढे स्व. माणिकरावजी गावीत यांच्या स्मरणार्थ नवापूर तालुका भाजपाच्या वतीने नवापूर
नगरपरिषदेस स्वेच्छेने देण्यात येत आहेत. कारण नवापूर नगरपरिषदेची आर्थिक स्थिती, फोटोप्रेमी लोकप्रतिनिधी व अकार्यक्षम प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नवापूर वासीयांना दुःखाच्या काळात देखील नागरिकांना मरणोत्तर यातना सहन कराव्या लागत आहेत.
त्यासाठी नवापूर शहरातील नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून नवापूर नगरपरिषदेस जळाऊ लाकुड देत आहोत. त्याचा स्विकार करुन आम्हास लोकसेवा करण्याची संधी द्यावी असे निवेदना मध्ये म्हटले आहे.
निवेदनावर भाजपचे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र गावीत,तालुका अध्यक्ष भरत गावीत,अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष एजाज शेख,नगरसेवक महेंद्र दुसाने,तालुका उपाध्यक्ष जितेंद्र अहिरे,माजी नगरसेवक रमला राणा,अजय गावीत,शहर अध्यक्ष प्रणव सोनार,तालुका युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश चौधरी,संदिप पाटील,कृणाल दुसाने,हेमंत शर्मा,गोपी सैन,जिग्नेशा राणा,माजी नगरसेविका सुनिता वसावे,अनिल दुसाने आदी पदधिकारी यांच्या सह्या आहेत.
यावेळी भाजपचे जिल्हासंघटन सरचिटणीस निलेश माळी,उपस्थित होते.या नंतर नवापूर नगरपालिके समोर लाकडाचा पिक वाहन लाऊन नवापूर नगरपालिकेचा विरोधात घोषना बाजी करत मुख्यधिकारी सप्नील मुधलवाडकर यांना निवेदन देणात आले.या नंतर लाकडाचे पिक वाहन अमरधाम येथे पाठविण्यात आले.