नंदुरबार l
शालेय जीवनात उत्तम आरोग्य कमावण्यासाठी दररोज योगासन करणे गरजेचे आहे. कोरोना काळात योगासनातून असंख्य फायदे आपल्याला झाले व योगासनामुळे उत्तम आरोग्य आपल्याला जपता आले. दैनंदिन जीवनात दररोज योगासन करा व निरोगी रहा, असा संदेश जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी दिला. ते येथील नाशिक विभागीय शालेय योगासन स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होत्या.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबार यांच्यावतीने व नंदुरबार जिल्हा योगा संघटनेच्या सहकार्याने नाशिक विभागीय शालेय योगासन स्पर्धा २०२२ चे आयोजन जी.टी.पाटील महाविद्यालय नंदुरबार येथे करण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन नाशिक विभागीय क्रीडा उपसंचालक सुनंदा पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.महेंद्र रघुवंशी, उपनगराध्यक्ष कुणाल वसावे, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव प्राचार्य पुष्पेन्द्र रघुवंशी, तालुका क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर, उपप्राचार्य एन.जे.सोमाणी, क्रीडा संचालक डॉ.तारक दास, जिल्हा योगा संघटनेचे सचिव प्रा.डॉ.मयुर ठाकरे, प्रा.सुदाम घाटे, राष्ट्रीय योगासन पंच डॉ.अनिता पाटील, सुनील पाटील, शांताराम मंडलिक आदी उपस्थित होते. आज झालेल्या स्पर्धेत १४ वर्षे मुले गटात प्रथम : पार्थ सचिन शिंदे, द्वितीय : प्रेम सुनिल शेलार, तृतीय : विवेक नानासाहेब अडसरे,
१७ वर्ष मुले गटात प्रथम : पवन शरद अहिरे, द्वितीय : यश रविंद्र विसपुते, तृतीय : मनीष प्रभाकर आहेर, १९ वर्ष मुले गटात प्रथम : रोहित प्रमोद कदम, द्वितीय : आशय निलेश हाड़कर, तृतीय : सार्थक संजय पाटील यांनी यश संपादन केले. स्पर्धेला पंच म्हणून चेतन वाघ, सुनील पाटील, लक्ष्मीकांत नेमाडे, नानासाहेब अडसरे हे काम पाहत आहेत. स्पर्धा यशस्वीतेसाठी मनीश सनेर, जगदीश वंजारी, मुकेश बारी, नितीन कबाडे, खुशबू घरटे, आकाश माळी, योगेश माळी, भूषण माळी आदी काम पहात आहेत.