सारंगखेडा l प्रतिनिधी
येथील चेतक फेस्टिव्हलमध्ये राष्ट्रीय अश्व पोस्टर प्रदर्शनाचे पोलीस अधिक्षक पी .आर. पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले . देशाच्या २० राज्यातील उत्कृष्ठ चित्रकारांनी साकारलेल्या अनेक चित्रकृती चे प्रदर्शन येथे आहेत , जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा , असे आवाहन पोलीस अधिक्षक श्री . पाटील व चेतक फेस्टिव्हलचे अध्यक्ष जयपालसिंह रावल यांनी केले आहे .
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या छायाचित्रकार आणि चित्रकाराने रेखाटलेल्या कलाकृतीच्या स्पर्धा असून त्यांचे प्रदर्शन लावण्यात आलेले आहे . प्रदर्शनाच्या उद्घाटना नंतर ही फोटो गॅलरी सर्वांसाठी विनामूल्य खुली करण्यात आली आहे . उद्घाटनाप्रसंगी चेतक फेस्टिव्हल समितीचे अध्यक्ष जयपालसिंह रावल , पोलीस निरिक्षक राजेश शिरसाठ , कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव संजय चौधरी , पोलीस उप निरिक्षक भगवान कोळी ,राजेंद्र तावडे आदी मान्यवर उपस्थित होते .
पोलीस अधिक्षक श्री . पाटील म्हणाले , चेतक फेस्टिव्हलमध्ये लावण्यात आलेल्या फोटो गॅलरीमुळे देशातील विविध राज्यातील व स्थानिक कलाकारांना त्यांच्या कलाकृतींना वाव मिळणार आहे . आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कलाकारांसोबतच स्थानिक कलाकारांच्या फोटोचे प्रदर्शन या ठिकाणी लावल्याने अनेक कलाकारांना शिकण्याच्या आणि रोजगाराच्या संधी प्राप्त होतील . यावेळी ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते.








