नंदुरबार l
येथील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे ओपन कुस्ती दंगल घेण्यात आली. यावेळी नंदुरबार जिल्हासह धुळे, जळगांव जिल्हा महाराष्ट्रातील अनेक पैलवानांनी हजेरी लावली. स्पर्धेचे विजेत्यांना राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजित मोरे, राष्ट्रवादी युवक प्रदेश सचिव राऊ मोरे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. यावेळी अंतिम कुस्ती चुरशीची झाली. मुख्य कुस्तीत धुळे येथील लड्ड्या पहलवान उर्फ प्रमोद जाधव याने हरियाणा येथील तस्लिम शेख याचा अवघ्या ४ मिनिटात पराभव केला. लड्ड्या पैलवान २०२२ चा शरद क्रीडा महोत्सव केसरी ठरला.
येथील तालुका क्रीडा संकुल येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे सवेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ओपन कुस्ती दंगलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस एन.डी. पाटील, जिल्हा उपाध्यक्ष मोहन माळी, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष कमलेश चौधरी, जिल्हा सरचिटणीस मधुकर पाटील, अल्पसंख्याक आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष जाकीर मिया जहागिरदार, राष्ट्रवादी युवक नंदुरबार तालुकाध्यक्ष ऍड.दिनेश माळी, विद्यार्थी सेलचे शहराध्यक्ष जयंत मोरे आदी उपस्थित होते.
स्पर्धेत मुलींची कुस्ती नंदुरबारकरांना पहायला मिळाली. यावेळी अंतिम कुस्ती चुरशीची झाली. मुख्य कुस्तीत धुळे येथील लड्ड्या पहलवान उर्फ प्रमोद जाधव याने हरियाणा येथील तस्लिम शेख याचा अवघ्या ४ मिनिटात पराभव केला. लड्ड्या पैलवान २०२२ चा शरद क्रीडा महोत्सव केसरी ठरला. विजयी कुस्तीगीरांना सन्मानचिन्ह, पितळी गदा तसेच रोख रक्कम देवून गौरविण्यात आले. स्पर्धेत पंच म्हणून बाळू पहेलवान, दिनानाथ जोहरी, जय मराठे, ईश्वर पहेलवान, रशिद हाजी, पावबा मराठे यांनी काम पाहिले.
स्पर्धेचे आयोजन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष लल्ला मराठे, नायाब कुरेशी यांनी केले होते. स्पधार् यशस्वीतेसाठी अर्जुन तात्या मराठे, सागर पाटील, दादू मराठे, भैय्या पहेलवान, रोहित दाणेज, गिरीष मराठे, जितू ठाकरे, कालू पहेलवान, मयुर पहेलवान, योगेश मराठे, राहुल मराठे, आनंदा मराठे तसेच जय हनुमान व्यायाम शाळा व मारुती व्यायाम शाळेच्या पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले.








