किक बॉक्सिंग व स्केटिंग स्पर्धेत डी.आर. हायस्कूल चे विद्यार्थी विभाग स्तरावर
नंदुरबार l प्रतिनिधी
येथील श्रीमती डी. आर. हायस्कूल येथील विद्यार्थ्यांनी शालेय जिल्हा क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन करून नाशिक विभाग स्तरावर धडक मारलेली आहे.
अजय शिवदास सकट याने 14 वर्षे वयोगटात किक बॉक्सिंग या स्पर्धा प्रकारात जिल्हास्तरावर यश मिळवून त्याची नाशिक विभागावर निवड करण्यात आलेली आहे त्यास शिवाजी चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.
तर स्केटिंग या स्पर्धा प्रकारात 17 वर्षे वयोगटात सुजल महेश तमायचेकर याने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून त्याची सुद्धा नाशिक विभागावर निवड झाली असून त्यास क्रीडाशिक्षक जगदिश बच्छाव यांचे मार्गदर्शन लाभले.
क्रीडा क्षेत्रात डी.आर. हायस्कूलला खूप मोठी परंपरा आहे व या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी तालुका, जिल्हा स्तरावर घवघवीत असे यश संपादन करून पुन्हा एकदा डी.आर. हायस्कूलच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा रोवला आहे त्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक नारायण भदाणे, उपमुख्याध्यापक सुभाष चौधरी, पर्यवेक्षक पंकज पाठक, विपुल दिवाण तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व खेळाडू व त्यांचे मार्गदर्शक क्रीडाशिक्षक यांचे कौतुक केले व त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्यात.








