नंदुरबार l प्रतिनिधी
येथील श्रीमती डी. आर. हायस्कूल येथील 17 वर्ष वयोगटातील कबड्डी संघाने तालुकास्तरावर झालेल्या चित्त थरारक अशा अंतिम सामन्यात तालुकास्तरावर विजय मिळवून जिल्हास्तरावर धडक मारलेली आहे.
यशस्वी कबड्डी संघातील खेळाडू वैभव गिरासे, लखन कोळी, रोहित पवार, राज भिल, युवराज चव्हाण, मयूर गिरासे, पुष्पेन्द्र कासार, चंद्रकांत पाटील, गणेश गवळी, कृष्णा चौधरी, गौतम राठोड या सर्व खेळाडूंचे व त्यांचे मार्गदर्शक निलेश गावित यांचे मुख्याध्यापक नारायण भदाणे, उपमुख्याध्यापक सुभाष चौधरी, पर्यवेक्षक पंकज पाठक, विपुल दिवाण तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.








