नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथून गुजरात येथे मक्याने भरलेला ट्रक न घेवून जाता कोठेतरी पळून गेल्याप्रकरणी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, आनंद तालुक्यातील खंबात येथील विपुलभाई हरीभाई पटेल हा त्याच्या ताब्यातील ट्रकमध्ये नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीतून मका भरुन आनंद (मानसा) गुजरात येथे न घेवून जाता ट्रक व मालासह पळून केला. ट्रकमध्ये ४ लाख ६० हजार रुपये किंमतीचा ४०० कट्टे एकूण २०० क्विंटल मका होता.
याबाबत ट्रक ट्रान्सपोर्ट चालक महेश रंजितसिंग रघुवंशी यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात विपुलभाई पटेल याच्याविरोधात भादंवि कलम ४०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक स्नेहदिप शिंदे करीत आहेत.








