नंदूरबार l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील रोझवा पुनर्वसन येथे खा.डॉ. हिना गावित तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.सुप्रिया गावित व जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.
दि.१० डिसेंम्बर २०२२ रोजी रोझवा पुनर्वसन ता.तळोदा येथे जल जिवन मिशन अंतर्गत १ कोटी ४३ लाख रुपयांच्या योजनेचा शुभारंभ खासदार डॉ.हिना गावित यांच्या हस्ते करण्यात आला . यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित ह्या उपस्थित होत्या. तर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी पंचायत समिती सदस्य दाज्या पावरा, जि.प.सदस्य रितेश वळवी, मंडाई फौंडेशनचे अध्यक्ष अमोल भारती, सरपंच सरदार पाडवी, उपसरपंच उदेसिंग तडवी, दिनेश पावरा, कैलास पाडवी, छगन कोठारी, पंडित पावरा, रेल्या तडवी,महेश पाटील, पाणीपुरवठा अभियंता सागर पवार, ग्रामसेवक दिलीप खोब्रागडे , आपसिंग पाडवी , भूसरा वसावे, रमेश वसावे व गावकरी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित यांनी जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या विविध योजनांची माहिती उपस्थित समुदयास दिली. तर खा.डॉ. हिना गावित यांनी जल जिवन मिशन योजनेची इथंभूत माहिती व केंद्र सरकारच्या विविध योजना या विषयी आपल्या मनोगतातून विषद केल्या. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दाज्या पावरा यांनी केले.तर आभार उदेसिंग तडवी यांनी मानले.








