नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या चांदसैली घाटात दरड कोसळल्याने रस्ता बंद झाल्याने एका महिलेला उपचारासाठी नेता आले नाही, त्यांच्या पतीने आपल्या खांद्यावर टाकून पायपीट सुरू केली .मात्र सिदलीबाई पाडवी यांनी खांद्यावर अखेरचा श्वास घेत घाटातच जीव सोडल्याची धक्कादायक घडना घडली आहे.
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडयात असलेल्या धडगांव तालुक्यातील चांदसौली येथे मुसळधार पावसात दरड कोसळली . दरड कोसळल्यामुळे या परिसरातील घाट रस्ता बंद झाला आणि परिणामी नागरिकांना शहराकडे जाण्यासाठी पायी मार्गच शिल्लक राहीला . सिदलीबाई पाडवी या महिलेला पहाटे पाच व तिच्या पोटात दुखत असल्याने नातेवाईक तिला उपचारासाठी घेवुन जात असतांना दरड कोसळल्याने रस्ताच नसल्याने शेवटी त्यांच्या पतीने आपल्या खांद्यावर टाकून पायपीट सुरू केली .मात्र सिदलीबाई पाडवी यांनी खांद्यावर अखेरचा श्वास घेत घाटातच जीव सोडला.
या घटनेमुळे पुन्हा सातपुड्यातील आदिवासी तर दुर्दैव मृत्यू आणि दुःख समोर आलेले आहे. विशेष म्हणजे याच भागाचे प्रतिनिधित्व राज्याचे आदिवासी विकास मंत्री ऍड, के.सी.पाडवी करतात घाटात दरवर्षी दरड कोसळल्यामुळे बंद पडतो आणि हजारो आदिवासी बांधवांचा त्रास दायक ठरते,घाट रस्त्यांबाबात होणार्या अपघाताबाबत केंद्रीय मानवाधिकार आयोगाने देखील दखल घेतली आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाला चौकशी अहवाल देण्याबाबत सांगण्यात आले आहे. या भागात १३२ केव्ही विद्युत लाईट जात असल्याने सदर घाटात ब्लास्टिंग चे काम करण्यात येत आहे.त्यामुळे दरड कोसळत असल्यामुळे रस्ता बंद पडत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. सातपुड्यातील मरण यातना कधी संपेल असा सवाल उपस्थित केला जात आहेे.
तळोदा – अक्राणी मार्गांवरील चांदसैली घाटामध्ये पहाटेच्या सुमारास 100 मीटर भागात दरड कोसळली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांकडून दरड काढण्याचे काम सुरु आहे. सायंकाळी उशिरापर्यंत दरड हटविण्याचे काम पूर्ण होण्याची शक्यता असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सांगण्यात आले आहे. दरड कोसळल्यामुळे धडगावकडून तळोदाकडे येणारी रुग्णवाहिका घाटात अडकली होती. या रुग्णवाहिकेतील महिला रुग्णाचा उपचारासाठी वेळेत न पोहोचल्याने मृत्यू झाला आहे. पोलीस, महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत.