नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा दोन दिवसापूर्वी दुसऱ्यांदा कोरोनामुक्त झाला असताना आज पुन्हा नंदुरबार तालुक्यात कोरोना रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली.
नंदुरबार जिल्ह्यात दोन दिवसापूर्वी दोन रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.त्यामुळे दुसऱ्यांदा जिल्हा कोरोनमुक्त झाला होता. दरम्यान आज 187 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली.त्यापैकी नंदुरबार तालुक्यातील नळवा येथील एकाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.सध्या विविध सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.