म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यात युवासेनेकडून बोगस आदिवासी व खोटा,बनावट जात प्रमाणपत्र असलेल्या बोगस आदिवासींची नोकरी रद्द करावे, या निषेधार्थ शहादा तालुक्यातील तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटल्याप्रमाणे बोगस आदिवासींना सेवा संरक्षण देणे, नोकरीत कायम करणे, आर्थिक लाभ देण्याचा दि. 29 नोव्हेंबर 2022 रोजी घेण्यात आलेला शासन निर्णय मागे घेण्यात यावे.
बोगस आदिवासी व बनावट जात प्रमाणपत्र असलेल्याना त्यांची नोकर सेवा रद्द करून खऱ्या आदिवासींसाठी नौकर भरती सुरू करून त्या स्थानी रुजू करण्यात यावे, अन्यथा युवासेनेकडून व तालुक्यातील संपूर्ण आदिवासी समाजाकडून शासनाविरोधी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची शासनाने नोंद घ्यावी.
यावेळी उपस्थित युवा सेनेचे उपजिल्हा अधिकारी गोपाल भंडारी, युवा सेना तालुका अधिकारी सुजित पावरा, संजय भंडारी, सचिन पवार,जुलाल ठाकरे, जितेन पावरा,रंजीत पावरा, विशाल पावरा इत्यादी होते.









