Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कुऱ्हावद येथे विद्यार्थ्यांनी राबविला भ्रष्टाचाराची साकळी तोडा उपक्रम 

team by team
December 10, 2022
in शैक्षणिक
0
कुऱ्हावद येथे विद्यार्थ्यांनी राबविला भ्रष्टाचाराची साकळी तोडा उपक्रम 
म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील  कुऱ्हावद त.सा. येथे आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन साजरा झाला. त्यात भ्रष्टाचार ही सर्वात जटिल सामाजिक, राजकीय आणि आर्थिक घटनांपैकी एक आहे, ज्याने जगातील सर्व देशांना प्रभावित केले आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध जनजागृती करण्यासाठी दरवर्षी ९ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन (International Anti Corruption Day) साजरा करण्यात येतो.
     भ्रष्टाचार समाजातील खुपच गंभीर समस्या आहे. ही समस्या पुर्ण समाजाला पोकळ करीत आहे. प्रत्येक क्षेत्र कमी-जास्त प्रमाणात भ्रष्टाचारामध्ये गुंतल्याचे आढळून येते आहे. आजकाल आपण वर्तमानपत्रे, सोशल मिडीया व इतर मार्गाने भ्रष्टाचारबद्दल नवनवीन घोटाळे ऐकतो, वाचतो. भ्रष्टाचार हे गुणवत्तापुर्ण शिक्षण, संस्कार, कायदा, प्रामाणिकपणा, नितीनियम, कर्तव्य, निस्वार्थ सेवाभाव, अशा गोष्टींना संपवित आहे.भ्रष्टाचाराला आव्हान देणे हे तरुणांचे कर्तव्य आहे. आजच भ्रष्टाचाराच्या विरोधात कार्य करा. भ्रष्टाचार रोखता येतो, देशाचा विकास दर आहे ना वाढवायचा तर भ्रष्टाचाराला मुळातून मिटवूया. देश पुढे नेऊया. थांबवा भ्रष्टाचार नका होऊ त्यात सहभागी हाच सल्ला आहे सर्वांचा.
         या सर्व गोष्टी विचारात घेता, के व्ही पटेल कृषी महाविद्यालयाच्या भिष्मानंद जाधव, हर्षल बैसाणे, मयूर पाटील, स्वप्निल पाटील, भावेश पटेल, ऋषिकेष बागले या कृषिदूत कुऱ्हावद या गावात ग्रामीण कृषि कार्य अनुभव या कार्यक्रमा अंतर्गत जागतिक भ्रष्टाचार विरोधी दिवसा निम्मित शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यामध्ये त्यांनी भ्रष्टाचाराचे तोटे व त्याचा समाजावर होणारा परिणाम या बद्दल लोकांना मार्गदर्शन केले. आपल्यावर होणारा भ्रष्टाचार कसा थांबवावा व त्या संदर्भातील नियम व कायदा स्थानिक लोकांना सांगितले तसेच भ्रष्टाचाराच्या नियंत्रणाकरीता काही उपाय योजना सांगितल्या या प्रसंगी गावातील सरपंच भिमसिंग मोरे, पोलीस पाटील रेखाबाई कूवर, उपसरपंच फुलू तुकाराम चव्हाण, भरत दगडु पाटील, गोविंद श्याम पाटील,काशिनाथ बधू पाटील व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

बोगस आदिवासी हटावबाबत युवासेनेकडून निवेदन

Next Post

जिल्हा प्रशासन व एन.टी. व्ही. एस. विधी महाद्यालयाच्या वतीने मानवाधिकार दिन साजरा

Next Post
जिल्हा प्रशासन व एन.टी. व्ही. एस. विधी महाद्यालयाच्या वतीने मानवाधिकार दिन साजरा

जिल्हा प्रशासन व एन.टी. व्ही. एस. विधी महाद्यालयाच्या वतीने मानवाधिकार दिन साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026
नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

June 23, 2026
शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

June 23, 2026
आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add