नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा तेली कर्मचारी महासंघाचा मेळावा कन्यादान मंगल कार्यालय नंदुरबार येथे श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जयंती निमित्ताने नुकताच साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमात माजी आमदार शिरीष चौधरी ,नंदुरबार जिल्ह्याचे तेली समाज अध्यक्ष संदीप चौधरी, शहर उपाध्यक्ष सुभाष चौधरी,प्रदेश संघटन सचिव तेली महासभा अशोक चौधरी, जिल्हा तेली समाज उपाध्यक्ष भरत चौधरी यांच्यासह जिल्ह्यातील विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमात माजी आमदार शिरीष चौधरी यांनी आपल्या मनोगतातून समाजाच्या एकसंघतेविषयी विचार मांडले. तसेच जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी समाजाच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक वृद्धीसाठी कार्य करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. तसेच समाजातील अनिष्ट रूढी -परंपरा दूर व्हाव्यात यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचे आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
सदर कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध शासकीय निमशासकीय कार्यालयात कार्यरत असणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेतला. तसेच नंदुरबार जिल्हा तेली कर्मचारी महासंघाच्या पुढील वाटचालीच्या संदर्भात चर्चेत विविध मुद्द्यांवर एक मत करण्यात आले.यात जिल्हा कर्मचारी महासंघ स्थापन करून कार्यान्वित करण्याबाबत निश्चित करण्यात आले. सदर कार्यक्रमास समाजातील बहुसंख्य कर्मचारी बंधू व भगिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्तविकात रमेश चौधरी यांनी कर्मचारी महासंघ स्थापन करण्याचा उद्देश सविस्तर स्पष्ट केला. सदर कार्यक्रमात कमलाकर चौधरी, मोगीलाल चौधरी, राजेंद्र चौधरी, वसंत वाघ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांच्या एकमेकांशी परिचय करून देण्यात आला.
तेली कर्मचारी महासंघ एकत्र येण्यासाठी स्थळ विनामूल्य तसेच अल्पोहार व चहा पाण्याची व्यवस्था संदीप चौधरी ( नंदुरबार जिल्हा तेली समाज अध्यक्ष ) यांच्यामार्फत करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी धर्मराज चौधरी, भूपेंद्र चौधरी, शैलेश चौधरी, महेश चौधरी ,दीपक चौधरी, कपिल चौधरी, सुनील चौधरी, चंद्रशेखर चौधरी ,गणेश चौधरी ,रवींद्र चौधरी, कैलास चौधरी, हरिश चौधरी, राकेश चौधरी,अनिल चौधरी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश चौधरी यांनी केले.









