नंदुरबार l

आयान शुगर नंदुरबार व जिल्हाधिकारी नंदुरबार यांचे संयुक्त विद्यमाने वंचित व स्थलांतरीत ऊसतोडणी मजुरांसाठी नंदुरबार पुरवठा विभाग यांच्यामार्फत धान्य वाटप, कारखान्याने मजुरांचे मुलांसाठी उभारलेल्या साखर शाळेचे उद्घाटन व ऊस वाहतुक वाहनांना रेडीयम वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या वेळी जिल्हाधिकारी मनिषा खत्री, सहा.जिल्हाधिकारीे मिनल करनलाल, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, उप.परिवहन अधिकारी श्री.बीडकर, कारखान्याचे जनरल मॅनेजर पद्माकर टापरे, शेतकी अधिकारी ए.आर.पाटील व इतर अधिकारी, कर्मचारी, ऊस तोडणी मजुर, वाहन चालक उपस्थित होते. या वेळी स्थलांतरीत मजुरांसाठी कारखान्याने उपलब्ध केलेल्या पाणी, लाईट, धान्य, साखर शाळा, इ.सुविधांची जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष झोपडीत जाऊन पाहणी केली. त्यानंतर रेडीयम लावलेल्या वाहनांची पाहणी केली. या वेळी कारखाना व्यवस्थापनाने केलेल्या कामाचे जिल्हाधिकारीे यांनी कौतुक केले.









