Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे आजपासून तीन दिवस राष्ट्रवादी मंथन शिबीर

team by team
December 10, 2022
in राजकीय
0
राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे आजपासून तीन दिवस राष्ट्रवादी मंथन शिबीर

नंदुरबार  l प्रतिनिधी

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसनिमित्त नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे दि. १० ते १२ डिसेंबरदरम्यान राष्ट्रवादी मंथन शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. नंदुरबार, नवापूर व शहादा येथे हे शिबीर घेण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांनी दिली.

येत्या १२ डिसें. रोजी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांच्या ८३ वा वाढदिवस जिल्हाभरात मोठ्या उत्साहाने साजरा करण्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीने ठरविले आहे. त्यानिमित्ताने शिर्डी येथे झालेल्या राज्यस्तरिय शिबिराचा धर्तीवर नंदूरबार जिल्ह्यात देखील तालुकास्तरीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. १० डिसेंबर रोजी शहादा तालुक्याचे राष्ट्रवादी मंथन शिबीर हे ब्राम्हणपुरी येथे होणार असून सकाळी १० वाजेपासून सुरु होणार्‍या या शिबिरास अनेक मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे.दि. ११ डिसें. रोजी नंदुरबार तालुक्याचे राष्ट्रवादी मंथन शिबीर हे सेंट मदर टेरेसा स्कुल येथे आयोजित करण्यात आले आहे .दि. १२ डिसें. रोजी नवापुर तालुक्याचे राष्ट्रवादी मंथन शिबीर आयोजित करण्यात आले आहे
युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे देखील ऍड. राऊ मोरे यांच्या सहकार्याने नंदूरबार शहरातील चार पोलीस स्टेशनला वॉटर कुलर भेट देण्यात येणार आहे.तळोदा तालुक्यात गरजूंना ब्लँकेट वाटप करण्यात येणार असून अनेक कार्यकर्त्यांचे पक्ष प्रवेश देखील माजी आमदार उदेसिंग पाडवी यांच्या हस्ते होणार आहे.

शहादा तालुक्याचे भूलाने येथे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माधवराव पाटील व शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर यांच्या सहकार्याने भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दि. ४ डिसें. ते ११ डिसें. दरम्यान होत आहे . दि. १०,११ आणि १२ डिसें. रोजी होणार्‍या राष्ट्रवादी मंथन शिबिरास जिल्हाप्रभारी मा. आ. अनिल गोटे, जिल्हानिरीक्षक नानासाहेब महाले, राष्ट्रवादीच्या नेत्या सिंधुताई तुपकर आदि प्रमुखांची उपस्थिती राहील. तरी जास्तीत जास्त संख्येने शिबिरास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार येथे 12 डिसेंबरपासून चाचा नेहरु बाल महोत्सवाचे आयोजन

Next Post

आवडीच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना पुढे जाण्याची संधी उपलब्ध करून द्यावी : मा.आ.शिरीष चौधरी

Next Post
आवडीच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना पुढे जाण्याची संधी उपलब्ध करून द्यावी : मा.आ.शिरीष चौधरी

आवडीच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना पुढे जाण्याची संधी उपलब्ध करून द्यावी : मा.आ.शिरीष चौधरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026
नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

June 23, 2026
शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

June 23, 2026
आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add