शहादा l प्रतिनिधी
पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळ संचलित कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात विश्व दिव्यांग दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी गट साधन केंद्र शहादा येथील विषय तज्ञ हेमंत पाटील, मिलिंद देसले,मिना गिरासे, प्रतिभा पाटील आदिंची प्रमुख उपस्थिती होती.दिव्यांग विद्यार्थीनी राजनंदिनी निकुंभ हिच्या हस्ते सरस्वती माता व लुईस ब्रेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.मुख्याध्यापिका निलिमा पाटील यांनी प्रास्ताविकात विश्व दिव्यांग दिवसाची माहिती दिली
.हेमंत पाटील यांनी दिव्यांग प्रकारांची विस्तारपूर्ण माहिती दिली.मिना गिरासे यांनी दिव्यांगाना सहकार्य करावे असे आवाहन केले.मिलिंद देसले यांनी शाळेतील दिव्यांग विद्यार्थिनीचा सन्मान केला.दिव्यांग दिनानिमित्त निबंध व चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मोनाली धारणे यांनी केले.