नंदुरबार l प्रतिनिधी
राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठात मा. कुलगुरू डॉ.प्रशांतकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 20 ते 22 दिसेंबर या तीन दिवस चालणार्या “एमपिकेव्ही क्लायमॅक्स – 2022” या कार्यक्रमात कृषि व इतर उद्योजकांचे प्रदर्शन, कृषि पदवीधरांचा मेळावा, कृषि पदवीधरांसाठी रोजगार मेळावा, यशस्वी कृषि उद्योजकांची व्याख्याने, शेतकर्यांसाठी चर्चासत्रे व इतर उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी, महिला व युवकांनी भेट देवून लाभ घेण्याचे आव्हान शासकीय कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.उत्तम होले यांनी केले आहे. या कार्यक्रमासाठी आत्तापर्यंत हजारो कृषि पदवीधरानी व पन्नासहून अधिक उद्योजकांनी नोंदणी केलेली आहे. या प्रदर्शनात कृषि पदवीधर उद्योजक, इतर उद्योजक, सरकारी, निमसरकारी, खाजगी संस्था व शेतकरी उद्योजक यांचे स्टॉल आहेत.