म्हसावद l प्रतिनिधी
महात्मा जोतिबा फुले युवा मंच ऑल इंडिया या सामाजिक संस्थेतर्फे क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील महिला शिक्षिकांना उत्कृष्ट शैक्षणिक कार्याबद्दल राज्यस्तरीय आदर्श महिला शिक्षक व आदर्श दाम्पत्य पुरस्कार देण्यात येणार आहे.
क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ३जानेवारी हा ‛महिला शिक्षक दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. महात्मा जोतिबा फुले युवा मंच ऑल इंडिया च्या पुरस्कारासाठी इच्छुक महिला शिक्षिकांनी आपले संपूर्ण नाव, पत्ता, नोकरीला असलेले शाळेचे नाव, विशेष उपलब्धी, केलेले सामाजिक कार्य व पासपोर्ट साईज फोटो 20 डिसेंबर 2022 पर्यंत संस्थेकडे पाठवावे असे आवाहन युवा मंचाचे संस्थापक अध्यक्ष ईश्वर संतोष माळी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ७४४८२११०११ या नंबरला संपर्क साधावा.