म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील म्हसावद पिंप्री शेत शिवारात मादी जातीची बिबट मृतावस्थेत आढळून आल्याने एकच भितीचे वातावरण पसरले आहे. याबाबत राणीपुर वनविभागात याची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,शहादा तालुक्यातील पिंप्री येथील कन्हेरी नदीला लागून संजय श्रीपत पाटील रा.पिंप्री यांचे १७/१ शेत आहे.या शेतात केळी लावलेले पिकक्षेत्र आहे.ते नेहमी प्रमाणे आज दि.7 डिसेंबर सकाळी दहा वाजता नियमित कामकाज निमित्ताने ते शेतात फेरफटका मारीत असताना त्यांना बिबट मादी मृत अवस्थेत आढळून आली. ते शेतातून घाबरून गावात परत आले. त्यांनी तात्काळ वनविभागाला याची माहिती दिली. तसेच ग्रामसेवक व ग्रामस्थांना याबाबत माहीती दिली.

तात्काळ राणीपुर वनविभागाचे वनक्षेत्रपाल महेश चव्हाण हे आपल्या कर्मचाऱ्यांचसह दाखल झाले.त्यानी शेतीच्या परिसरात पाहणी केली असता त्यांना काही ही आढळून आले नाही. मृत बिबट भक्षक शोधण्यासाठी आला असेल व याठिकाणी मयत झाला असेल असा अंदाज आहे.मृत बिबट मादी दिड ते दोन वर्षांची आहे. मृत बिबट्याचें जागेवरच पंचनामा करण्यात आला.
डॉ.सुभाष मुखडे यांनी राणीपुर येथे शवविच्छेदन केले मादी बिबट कशामुळे मृत्यू झाला याचा अहवाल आल्यावर समजेल.घटनास्थळी शहादा वन सरंक्षक संजय सांळूखे, तोरणमाळ परिक्षेत्राचे वन क्षेत्रपाल महेश चव्हाण, शहादा वनक्षेत्रपाल आशुतोष मेढे,तोरणमाळ वनपाल संजय पवार,वनपाल राणीपुर विजय मोहिते,राधेश्याम वळवी, वनरक्षक एस.एम.पाटील,सुभाष मुखडे व कर्मचारी यांनी भेट दिली.मयत बिबटयाला पाहण्यासाठी म्हसावद पिंप्री परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. तसेच म्हसावद पिंप्री,चिखली कानडी,बुडीगव्हाण, पाडळदा.कलसाडी आदी गावाकडे बिबट्या मुक्त संचार करीत आहे. त्यांचा बंदोबस्त करन्याची मागणी शेतकरी वर्ग व नागरिकांनी केली आहे.








