म्हसावद l प्रतिनिधी
संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आळंदी पुणे येथे केदारेश्वर प्रतिष्ठान लेवा पाटीदार गुजर समाज मंडळाचे वार्षिक स्नेह मिलन नुकतेच पार पडले.
कार्यक्रमासाठी, तुकाराम महाराजांचे कौटुंबिक वंशज प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.सदानंद मोरे ,लेवा गुजर समाजाच्या ज्येष्ठ मार्गदर्शिका,श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील,कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून सौ. संगीताबेन सुनीलभाई चौधरी , प्रमुख पाहुणे म्हणून आमदार महेश लांडगे, गटनेता पिंपरी चिंचवड नामदेवराव ढाके,जीसीसीए प्रेसिडेंट आर.वाय. पाटील, ज्येष्ठ मार्गदर्शक कृष्णाभाई पाटील , प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष हेमलता पाटील,आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम हे आयोजित करण्यात आले होते.यात अवघ्या तीन वर्षाच्या चिमुकली राखीने गीतेतील पंधरावा अध्यायाचे तोंडपाठ वर्णन केले.तसेच केदारेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.अंबालाल पाटील यांनी प्रतिष्ठानचे प्रास्ताविक केले.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या समाज बांधवांना समाज विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. परिसरातील जेष्ठ नेते व सामाजिक, राजकीय, कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी कै.विश्रामकाका हरी पाटील यांना समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
याशिवाय डॉ.विजय गोविंद पटेल,पिपळोद नंदुरबार समाज गौरव पुरस्कार, वैद्यकीय सेवा अतुल चौधरी,बामखेडा,अहमदाबाद सामाजिक सेवा मिलिंद ब्रिजलाल पाटील काथर्दे, जळगाव कलाक्षेत्र डॉ.मुकेशभाई दामू पाटील,पाडळदा मुंबई, शिक्षण व संशोधन, राजेशभाई मोहन पाटील,पाडळदा,कृषी, हर्षलभाई सुभाष पाटील,शहादा, पुणे बिझनेस कु.सृष्टी गणेश पाटील, गुजरगल्ली शहादा क्रिडा,या मान्यवरांना विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी समाज गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.तर
श्रीमती शोभनाताई झिपरू पाटील विर गुजर सैनिक म्हणून नायक, विकासभाई पाटील,व्याहुर , आदर्श विधवा माता पुरस्काराने श्रीमती लताबेन छोटूभाई पाटील कोळदेकर,
विएसजीजीम सदस्य जगन्नाथ भाऊभाई चौधरी, नंदुरबार यांना ॲड. बी.बी पाटील उत्कृष्ट समाजसेवक पुरस्कार तर विनयभाई ओंकार पाटील, डामरखेडा यांना कै. विजय नरोत्तम पाटील उत्कृष्ट समाजसेवक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
यावेळी वर्ल्ड बुक रेकॉर्डमध्ये जागतिक विक्रम केलेल्या कुमारी स्वर्णीम सागर पाटील या चिमुकलीचा सन्मान करण्यात आला.
तर नवसारी येथील हितेश प्रकाश पाटील या विद्यार्थ्यांचा कै. राजेंद्र यशवंत पाटील गुणवंत विद्यार्थी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला
तसेच शालेय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांना रमण हरी चौधरी गुणवंत विद्यार्थी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी विविध ग्राम व शहरातून आलेल्या विएसजीजीम व गुजर समाज मंचच्या सदस्यांयाही सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर तसेच खा. श्रीकांत शिंदे यांनी शुभेच्छा पत्र देऊन कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या त्यानंतर सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत यावेळी मनोरंजनातून प्रबोधन करणे हे केदारेश्वर प्रतिष्ठान परंपरा कायम ठेवत सांस्कृतिक कार्यक्रमाचे माध्यमातून समाज प्रबोधन करण्यात आले .वेदांत ,खुशी, मयुरी, अपूर्वा स्मिताबेन ,डायाभाई संजयभाई अशोक पाटील यांनी सूत्रसंचालन केले.तर सचिव रविराज चौधरी व मोतीलाल पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केदारेश्वर प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकारनी मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.