Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आळंदी येथे केदारेश्वर प्रतिष्ठानतर्फे लेवा गुजर समाजाचे स्नेहमिलन उत्साहात

team by team
December 7, 2022
in सामाजिक
0
आळंदी येथे केदारेश्वर प्रतिष्ठानतर्फे लेवा गुजर समाजाचे स्नेहमिलन उत्साहात
म्हसावद l प्रतिनिधी
   संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आळंदी पुणे येथे केदारेश्वर प्रतिष्ठान लेवा पाटीदार गुजर समाज मंडळाचे वार्षिक स्नेह मिलन नुकतेच पार पडले.
कार्यक्रमासाठी, तुकाराम महाराजांचे कौटुंबिक वंशज प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.सदानंद मोरे ,लेवा गुजर समाजाच्या ज्येष्ठ मार्गदर्शिका,श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील,कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून सौ. संगीताबेन सुनीलभाई चौधरी , प्रमुख पाहुणे म्हणून आमदार महेश लांडगे, गटनेता पिंपरी चिंचवड नामदेवराव ढाके,जीसीसीए प्रेसिडेंट आर.वाय. पाटील, ज्येष्ठ मार्गदर्शक कृष्णाभाई पाटील , प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष हेमलता पाटील,आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सांस्कृतिक  कार्यक्रम हे आयोजित करण्यात आले होते.यात अवघ्या तीन वर्षाच्या चिमुकली राखीने गीतेतील पंधरावा अध्यायाचे तोंडपाठ वर्णन केले.तसेच केदारेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.अंबालाल पाटील यांनी प्रतिष्ठानचे प्रास्ताविक केले.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या समाज बांधवांना समाज विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. परिसरातील जेष्ठ नेते व सामाजिक, राजकीय, कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी कै.विश्रामकाका हरी पाटील यांना समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
याशिवाय डॉ.विजय गोविंद पटेल,पिपळोद नंदुरबार समाज गौरव पुरस्कार, वैद्यकीय सेवा अतुल चौधरी,बामखेडा,अहमदाबाद सामाजिक सेवा मिलिंद ब्रिजलाल पाटील काथर्दे, जळगाव कलाक्षेत्र डॉ.मुकेशभाई दामू पाटील,पाडळदा मुंबई, शिक्षण व संशोधन,  राजेशभाई मोहन पाटील,पाडळदा,कृषी, हर्षलभाई सुभाष पाटील,शहादा, पुणे बिझनेस कु.सृष्टी गणेश पाटील, गुजरगल्ली शहादा क्रिडा,या मान्यवरांना विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी समाज गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.तर
श्रीमती शोभनाताई झिपरू पाटील विर गुजर सैनिक म्हणून नायक, विकासभाई पाटील,व्याहुर‌ , आदर्श विधवा माता पुरस्काराने श्रीमती लताबेन छोटूभाई पाटील कोळदेकर,
विएसजीजीम सदस्य जगन्नाथ भाऊभाई चौधरी, नंदुरबार यांना ॲड. बी.बी पाटील उत्कृष्ट समाजसेवक पुरस्कार तर विनयभाई ओंकार पाटील, डामरखेडा यांना कै. विजय नरोत्तम पाटील उत्कृष्ट समाजसेवक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
यावेळी वर्ल्ड बुक रेकॉर्डमध्ये जागतिक विक्रम केलेल्या कुमारी स्वर्णीम सागर पाटील या चिमुकलीचा सन्मान करण्यात आला.
तर नवसारी येथील हितेश प्रकाश पाटील या विद्यार्थ्यांचा कै. राजेंद्र यशवंत पाटील गुणवंत विद्यार्थी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला
तसेच शालेय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांना रमण हरी चौधरी गुणवंत विद्यार्थी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी विविध ग्राम व शहरातून आलेल्या विएसजीजीम व गुजर समाज मंचच्या सदस्यांयाही सन्मान करण्यात आला.
 कार्यक्रमासाठी  मुख्यमंत्री  एकनाथराव शिंदे,  शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर तसेच खा. श्रीकांत शिंदे  यांनी शुभेच्छा पत्र देऊन कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या त्यानंतर सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत यावेळी मनोरंजनातून प्रबोधन करणे हे केदारेश्वर प्रतिष्ठान परंपरा कायम ठेवत सांस्कृतिक कार्यक्रमाचे माध्यमातून समाज प्रबोधन करण्यात आले .वेदांत ,खुशी, मयुरी, अपूर्वा स्मिताबेन ,डायाभाई संजयभाई अशोक पाटील यांनी सूत्रसंचालन केले.तर सचिव रविराज चौधरी व मोतीलाल  पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केदारेश्वर प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकारनी मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
बातमी शेअर करा
Previous Post

आठ डिसेंबर पासून सारंगखेडा यात्रोत्सवाला होणार प्रारंभ, आज निघणार एक मुखी दत्ताची पालखी

Next Post

शहादा पोलीस ठाण्यासमोरील घरात घरफोडी

Next Post
चौपाळे येथे एकास लोखंडी पाईपने मारहाण, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

शहादा पोलीस ठाण्यासमोरील घरात घरफोडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add