म्हसावद l प्रतिनिधी
अनकवाडे म्हसावद ता.शहादा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक भरारी पथकाने सापळा रचून परराज्यातील विदेशी दारूचा साठासह पिकप वाहन जप्त केले.
सविस्तर वृत्त असे की दि. 1डिसेंबर रोजी अनकवाडे म्हसावद ता.शहादा जि.नंदुरबार या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक येथील भरारी पथकाने सापळा रचून विदेशी दारूचासाठासह पिकप वाहन (क्र. MH-06-Aj-7178) यात 2674.80 लिटर दारुसाठा रूपये 26 लाख 26हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत कार्यवाही केली आहे.
या वाहनाचा फरार चालक, मालक, मद्य पुरवठादार, खरिदीदार,मद्यविक्री घेणारे,गुन्ह्याशी संबधित, ज्ञात अज्ञात फरार ईसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई विजय सूर्यवंशी ,आयुक्त,राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य,मुंबई. सुनिल चव्हाण,संचालक महाराष्ट्र राज्य,मुंबई मा.अर्जुन ओहोळ,विभागीय उपआयुक्त,राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभाग श्री.राठोड,अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क,नंदुरबार यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली.