भारतीय जनता पार्टीचे नवनियुक्त प्रदेश महामंत्री तथा उत्तर महाराष्ट्र प्रभारी व भाजपा नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांचे आज 3 डिसेंबर 2022 रोजी नंदुरबार शहरात दुपारी 3 वाजता आगमन होणार आहे. प्रदेश महामंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर विजय चौधरी प्रथमच मुंबईहून नंदननगरीत येत आहेत.
त्यानिमित्ताने नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने नंदुरबार शहरातील धुळे चौफुली येथे भव्य स्वागताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच नंदुरबार शहरातून बाईक रॉली द्वारे जिल्हा कार्यालयात आगमन व पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून स्वागत- सत्कार समारंभ होईल.
त्यानिमित्ताने जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, जिल्हा पदाधिकारी, प्रदेश पदाधिकारी, मंडल अध्यक्ष व त्यांची कार्यकारणी, मोर्चा आघाडी अध्यक्ष व त्यांची कार्यकारणी, जिल्हा परिषद सदस्य, नगराध्यक्ष, नगरसेवक, सभापती, शक्ती केंद्रप्रमुख, बुथ प्रमुख सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे अशी विनंती जिल्हा संघटन सरचिटणीस निलेश माळी यांनी केली आहे.