नंदुरबार l
दि.1 डिसेंबर,2022 (जिमाका वृत्तसेवा): जिल्ह्यात खरीप हंगाम 2022-23 मध्ये केंद्र सरकारने किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेत निश्चित केलेल्या हमीभावाने मका, ज्वारी व बाजरी खरेदीस ऑनलाईन पोर्टलवर नोंदणीसाठी 30 नोव्हेंबर, 2022 पर्यंत मुदत देण्यात आली होती. आता ही नोंदणी प्रक्रिया करण्यासाठी बुधवार, 7 डिसेंबर, 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी एस.बी.सोनवणे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
ज्या शेतकऱ्यांना मका, ज्वारी व बाजरी विक्री करावयाची आहे, अशा शेतकऱ्यांनी स्वत: नोंदणीसाठी लाईव्ह फोटो अपलोड करण्यासाठी नोंदणीच्या ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या हमीभाव योजनेचा लाभ घेवून मुदतीत नोंदणी करण्याचे आवाहन ही श्री.सोनवणे यांनी केले आहे.