Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तूरीवरील शेंगा पोखरणा-या अळ्यांचे व्यवस्थापन

team by team
December 2, 2022
in कृषी
0
तूरीवरील शेंगा पोखरणा-या अळ्यांचे व्यवस्थापन
किटकशास्त्रज्ञांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार यावर्षी चांगला पाऊसमान असल्यामुळे तूरीचे पिक चांगले आहे व येत्या पंधरवड्यात हे पिक फुलोऱ्यावर येईल. मागील आठवड्यातील असणारे रात्रीचे थंड हवामान तूर पिकावरील शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या वाढीस पोषक आहे व अशा वातावरणामुळे तूर पिकाला शेंगा पोखरणाऱ्या अळ्यापासून नुकसान होण्याची शक्यता आहे. तरी शेतकरी बंधूनी आपल्या तूर पिकाची पाहणी करून वेळीच उपाययोजना करावी असे आवाहन पुणे कृषि आयुक्तालयाचे कृषि सहसंचालक डॉ.तुकाराम मोटे यांनी केले आहे.
शेंगा पोखरणाऱ्या अळयांमध्ये पुढील प्रकारच्या अळयांचा समावेष होतो. शेंगा पोखरणारी अळी (हेलीकोवर्पा) : या किडीची मादी पतंग तुरीच्या कळ्या, फुले व शेंगा यावर अंडी घालते. अंडयातून निघालेल्या अळ्या तूरीच्या कळ्या आणि फुले खाऊन नुकसान करतात. पुर्ण वाढ झालेली अळी ३० ते ४० मि.मि. लांब, विविध रंग छटेत दिसुन येते जसे पोपटी, फिक्कट गुलाबी व करडया रंगाची असून तीच्या पाठीवर तुटक करड्या रेषा असतात. मोठया अळ्या शेंगांना छिद्र करून आतील दाणे पोखरून खातात. पिसारी पतंग : या पतंगाची अळी १२.५ मि.मि.लांब हिरवट तपकिरी रंगाची असते. तिच्या अंगावर सुक्ष्म काटे व केस असतात.
अळी शेंगावरील साल खरडून छिद्र करते. व बाहेर राहून दाणे पोखरते. शेंगे माशी: या माशीची अळी बारीक गुळगुळीत व पांढ-या रंगाची असून तिला पाय नसतात. तोंडाकडील भाग निमुळता व टोकदार असतो. ही अळी शेंगाच्या आत राहून शेंगातील दाणे अर्धवट कुरतडून खाते व त्यामुळे दाण्याचे नुकसान होते.
एकात्मिक व्यवस्थापन : या तीनही किडी कळया, फुले व शेंगावर आक्रमण करीत असल्यामुळे त्यांच्या व्यवस्थापनाकरीता जवळ जवळ सारखेच उपाय करावेत. शेतात प्रति हेक्टर २० पक्षी थांबे उभारावेत त्यामुळे पक्षी किडींच्या अळया खाऊन फस्त करतील. अळयांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर असल्यास तुरीच्या झाडाखाली पोते टाकुन झाड हलवावे त्यामुळे झाडावरील अळया पोत्यावर पडतील त्या गोळा करुन नष्ट कराव्यात.
किडींच्या नियंत्रणासाठी 50 टक्के फुलोरा असतांना निंबोळी अर्क 5 टक्के किंवा अझॅडिरेक्टीन 300 पीपीएम 50 मिली, किंवा अझॅडिरेक्टीन 1500 पीपीएम 25 मिली किंवा एच.एच.एन.पी.व्ही. 500 एल.ई किंवा बॉसिलस थुरिंनजिएसिस 15 मिली, क्विनॉलफॉस 25 ई.सी 3 ग्रॅम 10 लिटर पाण्यात पहिली फवारणी करावी. दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर 15 दिवसांनी करावी यासाठी इमामेक्टीन बेंझोएट ५ टक्के 3 ग्रॅम, एस. जी. किंवा लॅंबडा सायहॅलोथ्रीन ५ टक्के प्रवाही 10 मिली, किंवा ईथिऑन ५० टक्के ईसी 4 मिली, किंवा क्लोरॅनट्रीनीलिप्रोल १८.५ टक्के एस.सी. 2.5 मिली 10 लिटर पाण्यात फवारणी करुन तूरीवरील शेंगा पोखरणा-या अळ्यांचे व्यवस्थापन करावे असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

शेतकर्‍यांनी प्रक्रिया उद्योगाकडे वळावे : जि.प.अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित

Next Post

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

Next Post
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add